लग्न समारंभात संगीत कार्यक्रम करताय पोलीस विभागाची परवानगी घ्या

0
18

गोंदिया,दि. २५ : – भारतीय संस्कृती ही सर्वधर्म समभावाची आहे.कुठलाही धर्माचा सण,तौह्यार किंवा घरगुती लग्नसमारंभ असला तरीही सर्वजण खेळीमेळीच्या वातावरणात तो कार्यक्रम पार पाडतात.शेजारी असो की नातेवाईक त्याच्या लग्नसमारंभाला आपले समजून सर्वच आजूबाजुचेही सहकार्य करतात.परंतु सर्वोच्च न्यायालयाने अशा कार्यक्रमादरम्यानही संगीताच्या आवाजावर काही निर्बंध लादले आहेत जेणेकरुन त्या आवाजामुळे इतरांना त्रास होऊ नये हा चांगला उद्देश आहे.त्या उद्देशानुसारच आज गोंदियातील जलाराम मंगल कार्यालयात सुरु असलेल्या एका लग्नसमारंभातील कार्यक्रम एका शेजारील व्यक्तीच्या तक्रारीवरुन पोलीसांना बंद करावा लागला.यात पोलीसांचा काहीही दोष नाही,कारण त्यांच्याकडे तक्रार आली.त्या तक्रारीच्या आधारे त्यांना तक्रारकर्त्याची दखल घेत त्या संगीत कार्यक्रमात खरोखरच सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या संगीताच्या डेसीबलचे उल्लंघन होत असेल तर कारवाई करावीच लागेल.त्यानुसार होऊ शकते त्या लग्न समारंभाच्या संगीत कार्यक्रमातील आवाजात डेसीबलचा आवाज मोठा असावा तो बहुतेक सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या निर्देशाच्या वर असावा म्हणूच पोलीस अधिकारी गवई यांनी तो कार्यक्रमच बंद पाडला.या बंद पडलेल्या कार्यक्रमानंतर मात्र गोंदिया शहरात गेल्या 1 महिन्यात पार पडलेल्या किती लग्न समारंभातील लोकांनी एकतर परवानगी घेतली,त्यासोबतच इतर जे धार्मिक कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमातील मिरवणुकीचे आवाज खरोखरच सर्वो्च्च न्यायालयाने ठरविलेल्या निर्देशाच्या आत होते काय अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.लग्नसमारंभ हा पारिवारिक कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमातही विघ्न घालण्याचे काम आता सुरु झाल्याने ज्या कुणाला गोंदिया शहरातच नव्हे तर जिल्ह्यातही लग्न समारंभात डीजे किंवा स्पिकर लावायचे असेल त्यांना पोलीसांच्या परवानगीशिवाय गत्यंतर उरले नाही असेच म्हणावे लागणार आहे.

दरम्यान बेरार टाईम्सकडे जलाराम लाॅन येथील कार्यक्रमातील संगीत कार्यक्रम बंद पाडण्यासाठी पोलीस अधिकारी गवई आले आणि त्यांनी हा कार्यक्रम बंद पाडला अशी तक्रार करण्यात आली.त्यानंतर बेरार टाईम्सच्यावतीने पोलीस अधिक्षक विनीता शाहू यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करुन सदर प्रकरणाची पडताळणी करण्यात आली असता पोलीस अधिक्षक श्रीमती शाहू यांनी आपल्याकडे तक्रार आली त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशाचे उल्लघंन होत असेल तर कारवाई करण्यासंदर्भात संबधित अधिकार्याला निर्देश देण्यात आले होते अशी माहिती दिली.आमच्या समोर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशासमोर कुणीही महत्वाचा नाही.तक्रार आली तर कारवाई करावीच लागेल कारण सध्या परिक्षेचे दिवस असल्याने डिजे व इतर संगित यंत्रांच्या आवाजाने त्रास होत असल्यामुळे कारवाई करावी लागणार असल्याचे सांगितले.