मृतक पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटूंबाला १० लाख सानुग्रह धनादेश वितरीत

0
27

गोंदिया,दि. २५ :  : ११-भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक-२०१८ च्या बंदोबस्ताकरीता कर्तव्यावर असतांना पोलीस शिपाई अशोक सोनटक्के ब.नं.३२१ यांची प्रकृती अचानक बिघडल्याने २९ मे २१०८ रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. अर्थसहाय्य म्हणून त्यांच्या वारसांना आज २५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते १० लाख रुपये सानुग्रह राशीचे धनादेश वितरीत करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक विनीता साहू, उपल्हाधिकारी (निवडणूक) सुभाष चौधरी उपस्थित होते.पोलीस शिपाई सोनटक्के हे वर्धा जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. लोकसभा पोटनिवडणूक-२०१८ करीता ते गोंदिया पोलीस मुख्यालय कारंजा येथे कर्तव्यावर हजर होते. सदर घटनेनंतर त्यांच्या कुटूंबात त्यांची पत्नी अरुणा अशोक सोनटक्के, मुलगा (अपंग) अंकीत सोनटक्के वय २७ वर्ष, मुलगी अश्विनी सोनटक्के वय २४ वर्ष, हर्षल सोनटक्के वय १९ वर्ष असा त्यांचा कुटूंब आहे.