शिवणकरांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजपत अस्वस्थता : पंचम बिसेन

0
10

गोंदिया, ता. २ : जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याप्रसंगी भाजपातील नेत्यांची अस्वस्थता वाढलेली दिसून येत आहे. अनेक भाजपा नेत्यांची जळफळात होताना दिसतंय. मात्र सामान्य कार्यकर्ता विजय शिवणकर यांचे पाठीशी असून एक चांगला निर्णय केल्यासंबंधी आनंदी आहेत.
कारण भाजपामधील सध्या ज्यांचे हातात तालुक्यापासून थेट नागपूरपर्यंत, महाराष्ट्रापर्यंत नेतृत्व आहे त्यांचे अरेरावी, महत्वाकांक्षा, घमंड आणि बहुजनांचे नेतृत्व संपुष्टात आणण्याची प्रक्रिया जी सुरू केली आहे. त्यापासून सामान्य कार्यकर्ता दुःखी आहे. काही ठिकाणी बहुजनांचा चेहèयाचा मुखौटाचा उपयोग होत आहे. परंतु सत्तेचे केंद्र मात्र मुठभर असणाèया लोकांच्या हातात आहे. ही आम्ही भाजपत असताना प्रत्यक्ष अनुभवली. विजय शिवणकरांच्या पक्ष बदलामुळे आरोप प्रत्यारोपाची जी खालची पातळी भाजपा नेते गाठत आहेत. त्यावरून दिसून येते की, भाजपचे नेतृत्व किती खालच्या दर्जाच्या लोकांच्या हातात आहे. अरे ज्या महादेवराव शिवणकरांच्या भरवशावर पूर्ण विदर्भात सामराज्य उभे केले आणि त्यांनी वाढविलेल्या झाडाच्या सावलीत उभे राहून ज्या झाडाची ङ्कळे भाजप नेते चाखत आहेत, त्यांच्या करिता अपशब्दांचा प्रयोग होत आहे. यावरून दर्जा भाजप नेत्यांचा किती खालावला ते नक्की दुःखाची गोष्ट आहे. अजून महादेवराव शिवणकर यांनी पक्ष सोडलेला नाही. भाजपने जरी त्यांना सोडले असेल? दोन वर्षाआधी भाजपचे स्थापना दिन गोंदियाला झाले. देवेंद्र फडणवीस आले परंतु त्या दिवशी साधे निमत्रण सुद्धा भाजपने महादेवराव शिवणकर यांना देवू शकले नाही. सात ते आठ वर्षापासून अनेक बैठका झाल्या कार्यक्रम झाले, त्यांचेही निमंत्रण त्यांना दिले नाही. नका लिहू पत्रिकेवर नाव पण निमंत्रण तर देवू शकतात ना? आणि अपेक्षा उलट महादेवराव शिवणकर आणि परिवारांकडूनच की त्यांनी ङ्कक्त भाजपचीच सेवाच करीत रहावी. याकरिता अनेक कार्यकत्र्यांचे मनात आजही सल आहे. महादेवराव शिवणकरांना आणि विजय शिवणकरांना भाजपने दिले ते काही उपकार नाही केले. भाजपाजवळ विदर्भात दिवा लावायलाही मानुस नव्हता. तेव्हापासून शिवणकरांनी भाजपची ज्योत आजपर्यंत तेवत ठेवली. भाजप जवळ शिवणकरांना देण्यालायक होतेच काय? शिवणकरांनी भाजपला जे दिले ते अन्य कुठल्याही व्यक्तीने पूर्व विदर्भात दिलेले नाही. अनेक लोकांना भाजपने बरेच काही दिले. परंतु किती लोकांनी भाजपला टिकवून ठेवले. ४९ टक्के आदिवासी बहूल आमगाव विधानसभा क्षेत्रातून पाचदा निवडून येणे, ५० वर्षात कधीही न िजकणारी चिमुर लोकसभा qजकून कायमचा वोट बँक भाजपच्या बाजूने वळविणे, सतत धरणे, आंदोलने, मोर्चे शेतकèयांसाठी काढून भाजपचे बाजूने वातावरण तयार करणे हे शिवणकरांनीच केले. १९७७ पासून जेवढे निवडणुका महादेवराव शिवणकर लढले तेव्हापासून सतत एका विशेष वर्गाने आणि आमगावच्या एका शिक्षण संस्थेच्या काही लोकांनी त्यांच्या विरोधात काम करीत आलेले आहे. १९९९ च्या विधान सभेच्या निवडणुकीत चक्क स्व.मानकर गुरुजींचा मोठा बॅनर, फोटो लावूनच शिवणकरांच्या विरोधात प्रचार करण्यात आला. परंतु योग्यता आणि सत्यता बद्दल जनता सब जानती है त्यामुळे फरक शिवणकरांना पडला नाही. शेवटी तिकट त्यांना नाकारूनच घरी बसविण्यात आले.