भगवान परशुराम जयंतीचे नियोजन

0
8

गोंदिया,दि.२ : ब्राम्हण समाजाचे आराध्य दैवत भगवान परशुराम यांची दरवर्षी प्रमाणे यावर्षीही अक्षय तृतीयेला २१ एप्रिल रोजी भगवान परशुराम जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त समग्र ब्राम्हण सभेच्यावतीने महिला समाज मंडळ सभागृहात रविवारी २९ मार्च रोजी नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित पदाधिकाèयांनी परशुराम जयंती निमित्त शोभायात्रा व भजन संध्या कार्यक्रमा संदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली. तसेच यावर्षी जयंतीचे निमित्त साधून शंखनाद स्पर्धा व वरिष्ठ समाजसेवींचे सत्कार करण्याचे ठरविण्यात आले आहे. या सभेत मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. समग्र ब्राम्हण सभेची पुढील बैठक येत्या रविवारी ५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता महिला समाज सभागृहात ठेवण्यात आली आहे. तरी सर्व समाज बांधवांनी नियोजीत वेळेवर बैठकीत उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.