चंद्रपूरटोलीत विविध विकासाचे भूमिपूजन व डाॅ.आंबेडकरांच्या प्रतिमेचे अनावरण

0
13

गोरेगाव,दि.29ः-येथील नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये (चंद्रपूरटोली) बुद्धवासी स्व. राजुभाऊ टेंभुर्णीकर यांच्या प्रथम पुण्यातिथीच्या निमित्ताने बुद्धविहार परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाचे व आमदार विजय रहांगडाले यांच्या स्थानिक विकास निधीतून समाज भवनाचे भूमीपूजन करण्यात आले.या विविध कामाचे भूमिपूजन भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या हस्ते करण्यात आले.तर समाजकल्याण सभापती विश्वजीत डोंगरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळयाचे अनावरण करुन माल्यर्पण करण्यात आले.

कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष लक्ष्मण भगत,नगराध्यक्ष इंजी. आशिष बारेवार, नगरपंचायत सभापती हीरालाल रहंगडाले,रोशनीताई टेंभूर्णिकर,मधुमालाबाई साखरे,सभापती चंद्ररेखा कांबडे, दिलीप चौधरी, रेखलाल टेंभरे,नगरसेवक रेवेंद्र बिसेन,मनोज लटये,डाॅ.रुस्तम येडे,बी.टी.चौहान,भोजराज बारेवार,अरविंद जयस्वाल,नगरसेवक सुरेन्द्र पटले,मंसू मारबादे,वामन शहारे,सुभाष टेंभूर्णिकर,प्रकाश पंचभाई,मोरेश्वर कांबड़े,नितिन बारेवार,मोरेश्वर रहँगडाले,मोरेश्वर कटरे,नितिन कटरे,छन्नीलाल अगड़े,अरविंद मेश्राम,सलिम पठान,मनोज चौधरी,प्रशांत गणवीर,राजू मेश्राम ,राजू शहारे ,नरेश शहारे ,मनोज शहारे प्रामुख्याने उपस्थित होते

बुद्धविहार परिसर चंद्रपूर.टोली ईथे एक सुंदर विहार निर्माण करण्यचे विचार बुद्ध विहार समिती प्रभाग १२ चे  अध्यक्ष लक्ष्मीकांत बारेवार व अन्य समाज बांधवांनी मांडला होता.त्या मागणीला मान्य करून आमदार विजय रहांगडाले यानी स्थानिक विकास निधितुन १० लक्ष रु मंज़ूर केले.तर नगर पंचायतच्या माध्यमातुन सुद्धा या परिसराला विकसीत करण्याचा निर्धार नगराध्यक्ष आशीष बारेवार यानी व्यक्त केला आहे.यावेळी मुंबई वरुन आलेले क़व्वाल राजू वागुल व वैशाली किरण यांच्या दुय्यम क़व्वालीचे आयोजन करण्यात आले होते. आयोजनाच्या यशस्वीतेसाठी विकास साखरे,स्मित सांगोड़े, सचिन साखरे,रोहित टेंभूर्णिकर,दिनेश साखरे,मनीष साखरे,अमित साखरे,यश टेंभूर्णिकर ,अमित टेंभूर्णिकर ,प्रणय सांगोड़े ,संजय घासले,हेमराज  शहारे,घनश्याम  धमगाये, अनिल राउत ,तरुण पाटिल ,विकास बारेवार,नितिन कांबड़े  तसेच बुद्धविहार समितीच्या सर्व सदस्यानी परिश्रम घेतले.