पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते भिंतीपत्रक आणि घडिपुस्तिकेचे विमोचन

0
28
????????????????????????????????????

वाशिम, दि. २९ : पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज २९ जून रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या प्रारंभी नियोजन भवन येथे जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हा वार्षिक योजना सन २०१८-१९ या वर्षातील निधीतून तयार केलेले भिंतीपत्रक आणि राज्य सरकारच्या चार वर्षातील महत्वपूर्ण योजनांची माहिती देणाऱ्या ‘प्रतिबिंब विकासाचे..’ या घडीपुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्यातील नागरीकांना प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण आणि शहरी)डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या योजनांची माहिती व्हावी यासाठी हे भिंतीपत्रक तयार करण्यात आले आहे. राज्य सरकारने चार वर्षात जिल्ह्यात राबविलेल्या महत्वपूर्ण योजनांची माहिती देणारी घडीपुस्तिका जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केली आहे. या योजनांमध्ये जिल्ह्यातील दुष्काळ निवारणाच्या उपायायोजनानानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पसर्वांसाठी घरेजलयुक्त शिवार अभियानप्रधानमंत्री पीक विमा योजनामागेल त्याला शेततळेगाळमुक्त धरण गाळयुक्त शिवारसौर कृषीपंपाचे शेतीला पाठबळमुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनामहात्मा फुले जन आयोग्य योजनाप्रधानमंत्री कृषी सिंचन योजनाप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमसिंचन विहीरीचा कार्यक्रमपॉस मशिनव्दारे धान्याचे वितरणकृषी पंपांना वीज जोडणी या योजनांचा समावेश असून याबाबतची माहिती या घडीपुस्तिकेमध्ये देण्यात आली आहे.