पावसामुळे जनजीवन विस्कळीत रस्त्यावर पाणीच पाणी,नागरिकांच्या घरात शिरले पाणी

0
65

कुंभारेनगराला आले तलावाचे स्वरूप
गोंदिया,दि.03- सोमवारच्या रात्रीपासून पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली असून आज सकाळपर्यंत जिल्ह्यात 62.49 मिमी पावसाची नोंद झाली आहे.रात्रभर आलेल्या पावसामुळे सगळीकडेच जनजीवन विस्कळीत झाले असून तिरोडा तालुक्यातील सरांडी गावाजवळ निर्माणाधीन पुलाशेजारील चुकीने तयार करण्यात आलेला कच्चा रस्ता व दुभाजजामुळे पावसात ट्रक पलटल्याने तिरोडा-तुमसर मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली आहे.या अपघातात जिवितहानी झालेली नाही.तर गोंदिया शहरातील गणेशनगर भागात एक घर कोसळला असून शहरातील कुंभारेनगरातील पंचशील झेंडा चौक परिसरात दोन दिवस सतत आलेल्या पावसामुळे या परिसराला तलावाचे स्वरूप पसरलेले आहे.  दरवर्षीच ही समस्या असतानादेखील या क्षेत्रातील स्थानिक लोकप्रतिनिधी ही समस्या कामयस्वरूपी दूर करण्यात अपयशी ठरले आहेत. येथील नाल्या मोठ्या प्रमाणात तुंबल्याने   या वार्डातील पावसाचे पाणी मुख्य रस्त्यावर येत असून, तेथे तळे साचले आहे.  त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऐवढेच नाही तर,चक्क नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. 

आज जिल्ह्यात गोंदिया तालुक्यात 60 मीमी,गोरेगाव 37.30 मिमी,तिरोडा 62.84 मिमी,अर्जुनी मोरगाव 97.32 मिमी,देवरी 28.47 मिमी,आमगाव 84.40 मिमी,सालेकसा 35.20 मिमी तर सडक अर्जुनी तालुक्यात 65.20 मिमी पावसाची नोंद झालेली आहे.गोंदिया,तिरोडा,अर्जुनी मोरगाव,आमगाव व सडक अर्जुनी तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे.
अवघ्या काही तासाची दडी मारून बसलेल्या पावसाने आज २ जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरहासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले.  दरम्यान काल रात्री दोन वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली होती. या पावसाला अवघे काही तास उलटत नाही तोच, आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास आकाशात काळे कुट्ट ढग तयार झाले. त्यानंतर काही वेळातच वादळी वाNयासह पावसाने सुरूवात करून दिली. या पावसामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावरून वाहु लागले होते. रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. शहरातील वुंâभारे नगरात नागरी समस्या निर्माण होत आहेत. नागरिकांनी अनेकदा याबाबद तक्रारी स्थानिक नगरसेवकाकडे तक्रारी केल्या मात्र, त्यांनी फक्त पाहणी केली. त्यानंतर कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे नागरी समस्या सुटलेल्या नाहीत. शहरात दोन दिवसांपासून पावसाचे सावट आहे. वुंâभारेनगरातील सांडपाणी तेथेच साचून रस्त्यावर वाहत आहे. यामुळे साथीचे आजार होण्याची शक्यता आहे.  वार्डातील भैय्यालाल वासनिक,अजगर अली,मुन्ना डोहरे,सुनिल चव्हाण यांच्या घरासमोरील असलेल्या रस्त्यांवरून पाणी तुडूंब भरून वाहत असल्यामुळे त्यांना घराबाहेर जाणेसुद्धा कठिण होते. ऐवढेच नाही तर, त्यांच्या घरात पाणी शिरत असल्यामुळे रात्रभर जागतच रात्र काढावी लागते. मुख्य म्हणजे नगर परिषदेने मान्सूनपूर्व साफसफाई केल्याचा दावा केला असला तरी ही बाब वुंâभारेनगर वासीयांसाठी गौण ठरली असून मोठ्या प्रमाणात वार्डात जागोजागी स्वच्छता दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. ़वुंâभारेनगर येथील पंचशील झेंडा चौकात नाल्यांसह पक्का रस्त्यांची आवश्यकता असतानादेखील नगर परिषदेने याकडे जाणिकपुर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे दरवर्षीच पावसाळा आला की, नागरिकांच्या घरात पाणी शिरत असतो. याबाबद अनेकदा नागरिकांनी निवेदनेसुद्धा दिली. मात्र, नगर परिषदेने याकडे लक्ष दिले नाही. परिणामी वार्डातील नागरिकांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. तेव्हा त्वरीत स्थानिक लोकप्रतिनिधी व नगर परिषदेने वार्डातील समस्या सोडविण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नाही तर, नागरिकांच्या भावनांचा बांध नक्कीच पुâटेल. यात दुमत नाही. यासंदर्भात या वार्डाचे नगरसेवक संकल्प खोब्रागडे यांचेशी संपर्वâ साधण्याचा प्रयत्न केला,मात्र तो होऊ शकला नाही.
नाल्यांवर नागरिकांचे अतिक्रमण
वुंâभारेनगरातील नाल्यांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे नगर परिषदेला साफसफाई करण्याला त्रास होतो. त्यामुळे त्या नाल्यामुळे कचरा साचून पावसाचे पाण्याची बाहेर निकासी होत नाही. त्यामुळे पाणी रस्त्यांवर साचून राहतो. परिणामी वार्डातील रस्त्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त होते. काही ठिकाणी तर चक्क गल्ल्यांवरही नागरिकांनी अतिक्रमण केल्याने गल्ल्या लहान होऊन पाणी बाहेर जात नाही. त्यामुळे दरवर्षीच वुंâभारेनगरात रस्त्यांवर पाणी साचण्यामागचा कारण आहे. त्यासोबतच येथील नाल्या अरूंद  असल्यामुळेसुद्धा पाण्याची निकाशी होत नाही.
मैदानाला आले तलावाचे स्वरूप
वुंâभारेनगरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात परिसरात असलेल्या मैदानात लहान मुलांना खेळण्यासाठी खेळाचे साहित्य बसविण्यात आले आहेत. ते साहित्य मजबुत स्थितीत बसविण्यात न आल्यामुळे अनेक साहित्य जमिनीतून उखळून पडले आहेत. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून तलावाचे स्वरूप आले. कदाचित चुवूâन लहान बालके त्याठिकाणी खेळायला गेले तर, मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा मोठी दुर्घटना घडण्याअगोदरच नगर परिषदेने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
वृक्षलागवडीचे खड्डे गेले पाण्यात
शहरात नगर परिषदेच्यावतीने वृक्षलागवड मोहिमेतंर्गत वृक्षलागवड करण्यासाठी वुंâभारेनगरातील मैदान परिसरात खड्डे खोदून ठेवले. मात्र,मैदानात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून असल्यामुळे येथील स्थानिक लोकप्रतिनिधी झाडे लावणार कुठे? असा सवाल निर्माण झाला आहे. नगर परिषदेने खोलगट भागत हे खड्डे फक्त फोटोसेशनसाठीच खोदले असल्यामुळे खड्डे आता पाण्यात बुडाल्याने वृक्ष लागवडीचे फोटेसेशन कसे करणार?की,फक्त दाखविण्यासाठीच  हे खड्डे खोदून ठेवले होते. असाही प्रश्न आता सर्वसामान्य जनतेकडून विचारण्यात येऊ  लागला आहे.