मोटार अपघात मध्यस्थी कक्षाचे उद्घाटन

0
24

गोंदिया,दि.३ : समन्वयक, मेन मेडिएशन सेंटर, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मध्यस्थी केंद्र, गोंदिया येथे मोटार अपघात मध्यस्थी कक्षाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश-१ एस.बी.पराते, जिल्हा न्यायाधीश-२ ए.जी.जोशी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एम.बी.दुधे, दिवाणी न्यायाधीश(वरिष्ठस्तर) एन.आर.वानखडे, मुख्य न्यायदंडाधिकारी एन.जी.देशपांडे, जे.एम.चौहाण, आर.डी.पुनसे, व्ही.आर.मालोदे तसेच दिवाणी न्यायाधीश(कनिष्ठस्तर) व्ही.के.पुरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने यांनी यावेळी मोटार अपघातानंतर पुढील होणारी कार्यवाही लवकरात लवकर पार पाडावी याबाबत पोलीस विभागाला सूचना दिली. यावेळी एस.बी.पराते, ए.जी.जोशी, एन.आर.वानखेडे यांनी मोटार अपघाताबाबत उपस्थितांना विस्तृत माहिती दिली.
प्रास्ताविक ॲड. रंजिता शुक्ला यांनी केले. उपस्थितांचे आभार ॲड. हेमलता पतेह यांनी मानले. कार्यक्रमास जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष टी.बी.कटरे, पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे, सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी, जिल्हा वकील संघाचे सर्व वकील सदस्य, जिल्हा न्यायालयातील कमर्चारी, पॅनल वकील व पॅरा लिगल व्हालंटीअर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर.जी.बोरीकर, जी.सी.ठवकर, पी.एन.गजभिये, एस.एम.कठाणे, एल.पी.पारधी व एस.एस.पारधी यांनी सहकार्य केले.