१३ जुलै रोजी राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन

0
23
  • दाखलपुर्व, न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांवर सुनावणी

वाशिम, दि. ०३ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा यांच्या सूचनेनुसार रविवार१३ जुलै २०१९ रोजी वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत सन २०१९ मधील राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये दाखलपुर्व व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. तरी संबंधित पक्षकारांनी राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने मिटवावेतअसे आवाहन वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने करण्यात आले आहे.

दाखलपुर्व प्रकरणे जसे धनादेश अनादर प्रकरणेबँकेचे कर्ज वसुली प्रकरणेकामगाराचे वादविद्युत आणि पाणी देयक बद्दलची प्रकरणे व आपसात तडजोड करण्याजोगे फौजदारी प्रकरणेवैवाहिक आणि इतर दिवाणी वाद तसेच न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांमध्ये आपसात तडजोड करण्याजोगे फौजदारी प्रकरणेधनादेश अनादर प्रकरणेबँकेचे कर्ज वसुली प्रकरणेवैवाहिक वादकामगारांचे वादभू-संपादन प्रकरणेसेवाविषयक पगारभत्ते व सेवानिवृत्तीचे फायादेविषयक प्रकरणेमहसूल प्रकरणेविद्युत आणि पाणी देयकाबद्दलचे वादइतर दिवाणी प्रकरणे या संवर्गातील प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

लोक न्यायालयामध्ये जी प्रकाराने निकाली निघतील त्यातील पक्षकारांना अनेक फायदे होतात. लोक न्यायालयाच्या निवाड्याविरुध्द अपील करता येत नाही. एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते. खटल्यांमध्ये साक्षी पुरावाउलटतपासणीदीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात. निकाल झटपट लागतो. लोक न्यायालयात होणारा निवाडा हा आपसात समजुतीने होत असल्याने दोन्ही पक्षांना समाधान देतो. कोर्टाच्या हुकुमनाम्याप्रमाणे लोक न्यायालयात होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते. तसेच लोक न्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कम परत मिळते. ज्या पक्षकारांची वरील संवर्गातील प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत अथवा न्यायालयात दाखल व्हायची आहेत अशी (दाखलपूर्व) प्रकरणे राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सुनावणीसाठी ठेवण्याकरिता संबंधित न्यायालयातील तालुका विधी सेवा समिती अथवा वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि या राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटवावेतअसे आवाहन वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी केले आहे.