एकोडी येथे विद्यार्थी-पोलिस कॅॅडेट कार्यक्रम साजरा

0
13

गोंदिया,दि.06 : जिल्हा परिषद हायस्वूâल एकोडी/दांडेगाव येथे इयत्ता आठवी वर्गातील विद्याथ्र्यांमध्ये चांगले निती मुल्य रूजवून जबाबदार नागरिक बनविणे या उद्देशाने शासनातर्पेâ आयोजित विद्यार्थी पोलिस वॅâडेट कार्यक्रम घेण्यात आला. इयत्ता आठवी वर्गातील विद्याथ्र्यांची बद्धीमत्ता लवचिक असते. तसेच आकलन शक्ती विपुल असते. त्या आधारावर गुन्ह्यास प्रतिबंध, रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, सायबर क्राईम, नक्षलविरोधी जनजागृती अभियान, भ्रष्टाचार निर्मुलन, संवेदनशिलता, सहानुभूती, महिला व बालकांची सुरक्षितता, समाजाचा विकास तसेच दुष्ट सामाजिक प्रवृत्तीस आळा घालणे निती मुल्य शिस्त आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता आदि विषयांवर विद्याथ्र्यांना प्रशिक्षण देण्यात आले.सदर कार्यक्रम पोलिस अधिक्षक विनीता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलिस निरीक्षक सुधिर घोनमोडे, सहायक पोलिस निरीक्षक संजय सिंह, नापोशि रेखलाल गौतम, संजय मारवाडे, मपोशि ज्योती कटरे, किरण राठोड, पोलिस हवालदार लियोनार्ड मार्टिन आदिंनी मार्गदर्शन शस्त्र व दारूगोळ्याबाबत प्रात्याक्षिक करून दाखविले. तसेच विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला पोलिस निरीक्षक सुधीर घोनमोडे, महिला पोलिस निरीक्षक श्रीमती वैशाली पाटील, सहायक पोलिस निरीक्षक संजयसिंह, शामराव काळे, प्राचार्य एस.ए.कापगते, शिक्षक पी.एम.खडसे,एच.पी.दराडे, डी.एन.धुर्वे आदि उपस्थित ोते.कार्यक्रमाचे संचालन शिक्षक आर.एच.धुर्वे यांनी केले.