पूर परिस्थिती पूर्व शोध व बचाव प्रशिक्षण व साहित्य तपासणी कार्यक्रम

0
14

गोंदिया,दि.06ः– यावर्षी जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास शोध व बचाव कार्य कसे करायचे याबाबतचे प्रशिक्षण 5 जुलै रोजी नावेगावबांध जलाशयात अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले. तसेच या वेळी शोध व बचाव कामात उपयोगात येणारे साहित्यांची पडताळणी करण्यात आली.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमात OBM चालविणे व नियंत्रित करणे, बोट (डोंगा) चालविणे व नियंत्रीत करणे, लाईफबॉय, लाईफ जॅकेटची पडताळणी करण्यात आली.प्रशिक्षण व तपासणीला जि.प. उप अभियंता एल. जी. मुंदडा, उप कार्यकारी अभियंता बी.जे. ठाकूर, उपअभियंता एच. टी. निमजे, कनिष्ठ अभियंता पी. व्ही. भोयर, स्था.अभि.सहा. ए. एन. आदमने, कु. बी. एम. मेंढे, एच. एच. शहारे, शोध बचाव पथकाचे,आय.के. बिसेन, सी. जी. मुटकुरे, जे.आर. चिखलोंढे, जसवंत रहांगडाले, रवी भांडारकर, राजकुमार बोपचे, संदीप कराडे, सुभाष कश्यप, नरेश उके, धीरज दुबे, आय.एम.इंगडे उपस्थित होते.