नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्याहस्ते न.प.गडचिरोली येथील ध्वजारोहण

0
26
गडचिरोली,दि.15- नगरपरिषद गडचिरोली येथील ध्वजारोहण आज 15 ऑगस्ट रोजी सकाळी 7.40 वाजता नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्याहस्ते न.प.च्या पटांगणात करण्यात आले.शहरातील नागरिकांना संबोधीत करतांना नगराध्यक्षा योगिता पिपरे म्हणाल्या,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी व सामान्य नागरिक, शेतकरी, बेरोजगार यांच्यासाठी हीतकारक निर्णय घेवून सर्वसामान्य नागरिकांना फार मोठी तरतूद केली आहे. यामुळे महाराष्ट्र राज्याचा न झालेला विकास आता होणार आहे.वैशिष्टयपूर्ण थोक तरतूदीमधून 50 कोटी रूपये दिले असून त्यामधून शहरातील प्रमुख सिमेंट रस्ते बनविण्यासाठी 30 कोटी रूपये, लांझेडा येथील तलावात बगिच्या तयार करण्यासाठी 8 कोटी रूपये, खुल्या जागेचे सौंदर्यीकरण करण्यासाठी 5 कोटी रूपये, शैक्षणिक विकासासाठी रामनगर येथील पं.नेहरू नगरपरिषद शाळेच्या इमारत बांधकामास 50 लाख रूपये, रामपूरी न.प.शाळेतील वर्गखोलीच्या बांधकामासाठी 1 कोटी 20 लाख रूपये दिले. सावित्रीबाई फुले न.प.प्राथमिक शाळेतील वर्गखोली बांधकामासाठी 80 लाख रूपये, षेतीला जाणा-या पांदण रस्त्यासाठी 2 कोटी रूपये व बोरमाळा स्मशानघाट रोडसाठी 90 लाख रूपयांचा निधी खर्च होणार आहे. गडचिरोली शहरातील भूमिगत गटार योजनेसाठी 96 कोटी रूपये मंजूर करून निविदा काढण्यात आली असून लगेच कामाला सुरूवात होणार आहे.यावेळी नगराध्यक्षा योगिता पिपरे यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधनाच्या हार्दीक शुभेच्छा देवून नागरिकांना शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास मदत करावी, असे आवाहन केले.
ध्वजारोहण कार्यक्रमास न.प.चे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, मुख्याधिकारी संजय ओहोळ, बांधकाम सभापती आनंद श्रृंगारपवार, पाणी पुरवठा सभापती मुक्तेष्वर काटवे, शिक्षण सभापती वर्षा बट्टे, अर्थ व नियोजन सभापती प्रशांत खोब्रागडे, नगरसेवक प्रमोद पिपरे, रंजनाताई गेडाम, गुलाब मडावी, संजय मेश्राम, रमेश भुरसे, भुपेश कुळमेथे, वैष्णवी नैताम, लताताई लाटकर, निताताई उंदीरवाडे, केशव निंबोड, मंजुषा आखाडे,  वर्षा नैताम, रितु कोलते, अनिता विश्रोजवार, अल्का पोहणकर, प्रविण वाघरे तसेच प्रतिष्ठीत नागरिक डाॅ.शिवनाथ कुंभारे, माजी नगरसेवक शेखर भडांगे, प्रकाश ताकसांडे, तुळशिराम सहारे, नामदेव सोनटक्के, दुर्गा मंगर, खेवले, नागरिक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन ठाकरे यांनी केले.