स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील व्यक्ती सन्मानित

0
23

गोंदिया,दि.15 : पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी आज 15 ऑगस्ट रोजी कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर राष्ट्रध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी जिल्हयात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच व्यक्तीं व संस्थांचा सत्कार केला.

यामध्ये नक्षलग्रस्त भागात उत्तम सेवा केल्याबद्दल पोलीस विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन 2019 चे आंतरीक सुरक्षा सेवापदक जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक राजू मेंढे, पोलीस हवालदार मार्टीन लिओनार्ड, सेवक राऊत, पोलीस शिपाई आशिष वंजारी, राजेंद्र चकोले, अर्जुन सांगडे, हितेश बरीये यांचा, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया अंतर्गत वन व वन्यजीव संबंधित उत्कृष्ट कार्य केलेल्या उमरझरी वनक्षेत्राचे वनपरिक्षेत्रअधिकारी बालाजी भिवगडे, कोकाचे वनरक्षक साहेब आगलावे, पीटेझरीचे वनरक्षक गिरीधरगोपाल गोहरे व विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे वनरक्षक दिनेशकुमार भगत, सामाजिक क्षेत्रात हर्ष मोदी, सर्पमित्र शंशाक लाडके,  नगरपालिकेचे फायर फायटर जितेंद्रसिंह गोटे यांचा, लायन्स क्लब गोंदिया राईस सिटी लायन्स क्लब गोंदिया यांच्यावतीने बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालय येथे 408 दिवसांपासून रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोफत भोजन देत असल्याबद्दल भरत क्षत्रीय, संदीप कडूकर, विजय शर्मा, अजय जयस्वाल, गौरव बग्गा, प्रदीप जयस्वाल, लायन्स क्लब गोंदिया यांच्यावतीने कुंवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथील रुग्णांना व नातेवाईकांना मोफत भोजन देत असल्याबद्दल अशोक अग्रवाल, सिताराम अग्रवाल, कालूराम अग्रवाल, मनोज डोहटे, हुकुमचंद अग्रवाल यांचा, आदिवासी बहूल नक्षलग्रस्त क्षेत्रात आरोग्य सेवेत अनेक वर्षापासून काम करीत असलेल्या सुशीलकुमार जैन, पर्यावरण संवर्धानासाठी अतिदुर्गम चिचगड भागात काम करणारे शिवछत्रपती प्रतिष्ठान चिचगडचे उमेश गिरी, विविध ठिकाणी स्टॉल लावून मागील एका वर्षापासून निरंतर सर्वसामान्याकरीता निशुल्क भोजन देणारे गोंदिया येथील खालसा सेवा दल, आदिवासी बहूल नक्षलग्रस्त सालेकसा तालुक्यात भजेपार येथे मागील 9 वर्षापासून स्वदेशी खेळाला व प्रतिभावान खेळाडूंना चालना देणाऱ्या सुर्योदय क्रीडा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकुमार बहेकर चित्रकला आणि संस्कार भारतीशी जुळलेल्या वृक्षारोपण चळवळीस चालना देणारे चित्रकार अरुण नशीने, आमगाव येथील गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष सतीश असाटी, आरोग्य क्षेत्रात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून चान्ना/बाकटी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून उत्तम काम करणारे डॉ.कुंदनकुमार कुलसंगे, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत क्षयरुग्णांना योग्य व नियमित औषधोपचार करणारे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एम. चौरागडे, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक भोजेंद्र बोपचे, संजय रेवतकर, संजय भगवतकर यांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.