कुऱ्हाडी येथे श्री पध्दतीने धान लागवड कृषी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उपक्रम

0
48

गडचिरोली,दि.21:-  येथील कृषी महाविद्यालयाच्या अंतीम वर्षाच्या विद्यार्थीनींनी गडचिरोली तालुक्यातील कुऱ्हाडी येथील पांडुरंग अलाम यांच्या शेतात श्री पध्दतीने धानाची लागवड करण्याचे मार्गदर्शन केले व प्रात्यक्षिक करुन दाखविले. धानाची श्री पध्दतीने लागवड करण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान व त्याची संपुर्ण माहिती विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना दिली. श्री पध्दतीने लागवड केल्यानंतर होणारे फायदे विद्यार्थींनीनी समजावून सांगितले. तसेच भात पिकावरील येणाऱ्या रोग व किड याबाबत माहिती देऊन त्यांचे योग्य पध्दतीने व्यवस्थापन कसे करावयाचे याबध्दल माहिती अवगत करुन दिली.यावेळी कृषिमित्र अंकुष चुधरी यांनीही विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या निमित्ताने सहकार्य केले. श्री पध्दतीने लागवड पाहण्यासाठी कुऱ्हाडी येथील परिसरातील शेतकऱ्यांनी हजेरी लावली.  शिवानी पांडुरंग कावळे, काजोल अगळे, मोनी शेरकी, पुजा बल्की, प्रणाली जांभुळे व मानसी कुमरे हे उपस्थित होते.