जिल्हास्तरीय ग्रामस्वच्छता अभियानात भागी प्रथम,सिरेगावबांध व्दितीय

0
16

अर्जूनी/मोर ( संतोष रोकडे),दि.22ः-संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान सन २०१८-१९ अंतर्गत जिल्हा स्तरीय घेण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून गोंदिया जिल्ह्यातून  देवरी तालुक्यातील भागी ग्रामपंचायत १७० गुण घेऊन प्रथम तर अर्जुनी/मोर तालुक्यातील सिरेगावबांध ग्रामपंचायत १६७ गुण घेऊन व्दितीय तर गोरेगाव तालुक्यातील सटवा ग्रामपंचायत १६० गुण घेऊन तृतीय पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०१८-१९ अंतर्गत गोंदिया जिल्ह्यात शासन निर्णयानुसार राबविण्यात आला. गोंदिया जिल्ह्यातील पंधरा जिल्हा परिषद गटातील प्रथम क्रमांकाच्या ग्रामपंचायतमधून जिल्हास्तरीय तपासणी करून राष्ट्संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेतर्गत गुणांकन अंती जिल्हास्तरीय पुरस्कारांसाठी गोंदिया जिल्ह्यातून तीन ग्रामपंचायतींची प्रथम.द्वितिय व त्त्रितीय क्रमांकासठी निवड करण्यात आली आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी,मुख्य कार्याकारी अधिकारी,.पंचायत व स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड यांच्यासह इतर अधिकारी पथकात असलेल्या समितीने ही तपासणी केली.
जिल्ह्यातून प्रथम व द्वितिय आलेल्या भागी व सिरेगावबांध ग्रामपंचायती विभागीय स्पर्धेसाठी आपल्या स्तरावर स्पर्धा तयारी सुरू करून विभागीय स्पर्धेसाठी सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शासन निर्णयानुसार संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियान सन २०१८-१९ मध्ये जिल्हा स्पर्धेसाठी शासन निर्णयानुसार विविध स्पर्धा यशस्वीरित्या राबविण्यात आल्या. यामुळेच सिरेगावबांध ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय द्वितिय पुरस्कार प्राप्त झाल्याने विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू करण्यात आली असून विभागीय स्तरावर पुरस्कार मिळवू असे सरपंच हेमक्रुष्ण संग्रामे यांनी म्हटले आहे.