जि.प.पदाधिकायांना प्रभारी कार्य.अभियंत्याने ठेंगा दाखविला

0
10

ल.पा.विभागाच्या बंधाèयाची काढली ई निविदा
गोंदिया-जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फेत तयार करण्यात येणाèया सुमारे ८९ बंधारे बांधकामाना घेऊन गेल्या तीन स्थायी समीतीच्या बैठकीपासून सभा गाजत आहे.त्यातच उद्या शुक्रवारी होणाèया सर्वसाधारण सभेत यावर निर्णय घेण्याचे ठरविले असतांना स्थायी समितीच्या निर्णयाला व जि.प.पदाधिकाèयांच्या निर्णयाला
ठेंगा दाखवित प्रभारी कार्यकारी अभियंता सुरेश गिरी यांनी बुधवारच्या सायंकाळी ६ ते ९ दरम्यान कार्यालयात ई निविदेची प्रकिया पार पाडली.ज्या बंधाèयावरुन वादळ सुरु आहे त्याच ६५ बंधाèयाची ई निविदा प्रकाशित करुन स्थायी समितीच काय पदाधिकाèयाला मोजत नसल्याचे गिरी यांनी दाखविले.तसेच माझ्या पाठीशी जिल्ह्याचे पालकमंत्र्यासह आमदारांचे पाठबळ असल्याचेही दाखवून दिले आहे.
याच बंधाèयाना घेऊन तसेच आदिवासी विकास योजनेच्या बंधाèयांच्या वाटपात अनियमितता असल्याचा ठपका आमदार संजय पुराम यांनी ठेवला होता.त्या पत्रावर पालकमंत्र्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना पत्र पाठवून कार्य.अभियंता वाकोडीकर यांना हटवून चौकशीची मागणी केली होती.त्यानुसार जलसपंदा मंत्री यांच्या पत्रानुसार अधिक्षक अभियंत्यांनी वाकोडीकर यांना हटवून गिरी यांना प्रभार सोपविला.विशेष म्हणजे पालकमत्री यांच्या पत्रात स्पष्टपणे गिरी यांची नियुक्ती करण्यात यावी अशी विनंती करण्यात आल्याने जिल्ह्यातील विकासात आता राष्ट्रवादीचे जि.प.अध्यक्ष विरुध्द भाजपचे पालकमंत्री,आमदार व जि.प.सदस्य असे वातावरण तयार झाले आहे.अवघ्या दोन महिन्यावर निवडणुका असताना भाजपने बंधारे प्रकरणात केलेल्या राजकारणाचा फटका त्यांच्याच जिल्हा परिषद सदस्यांना बसण्याची शक्यता आहे.तर गेल्या दोन स्थायी समितीच्या बैठqकना गैरहजर राहणारे गिरी हे उद्याच्या सर्वसाधारण सभेला सुध्दा गैरहजर राहून जिल्हा परिषद माझे काहीच करु शकत नसल्याचे दाखवितात की हजर राहतात याकडेही लक्ष लागले आहे.