गडचिरोलीत अपघात, नवविवाहित दाम्पत्यासह पाच जण जखमी

0
6

गडचिरोली, दि.६: लग्न आटोपून गावाकडे परत जात असताना अपघात झाल्याने नवविवाहित दाम्पत्यासह पाच जण जखमी झाल्याची घटना आज रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास गडचिरोली-आरमोरी मार्गावरील खरपुंडी नाक्याजवळ घडली. विशाल शंकर शेडमाके रा.पिपरटोला, ता.गडचिरोली व काजल देविदास गेडाम रा. मुरमाडी, ता. सिंदेवाही जि.चंद्रपूर अशी जखमी वर-वधूंची नावे आहेत.
पिपरटोला येथील विशाल शेडमाके यांचा विवाह आज सकाळी सिंदेवाही तालुक्यातील काजल गेडाम हिच्याशी पार पडला. त्यानंतर विशाल शेडमाके हे कारने पत्नी काजल व अन्य पाच जणांना घेऊन कारने गावाकडे जात होते. दरम्यान खरपुंडी नाक्याजवळून आपल्या गावाच्या रस्त्याच्या दिशेने वळत असताना समोरुन ट्रॅक्टर आल्याने अपघात झाला. यात वर-वधूसह कारमधील अन्य नागरिक जखमी झाले. सर्वांवर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.