भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर

0
10

मुंबई : भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच अन्य जिल्ह्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 25 ते 30 मे 2015 या कालावधीत संबंधित मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी दिली.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, 30 एप्रिल 2015 रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदारयादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरली जाईल. या यादीवरुन तयार करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेचे निवडणूक विभाग व पंचायत समितीचे निर्वाचक गणनिहाय मतदार याद्यांवर 25 मे 2015 पासून 30 मे 2015 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. 4 जून 2015 रोजी निवडणूक विभाग व निर्वाचक गणांच्या छापिल मतदार याद्या अधिप्रमाणित करण्यात येतील. त्याचदिवशी त्या मतदारांच्या माहितीसाठी ठेवण्यात येतील.मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या पंचायत समितींची नावे पुढीलप्रमाणे :

भंडारा जिल्हा परिषद, पंचायत समित्या: तुमसर, मोहाडी, भंडारा, साकोली, लाखनी, पवनी आणि लाखानदूर.

गोंदिया जिल्हा परिषद, पंचायत समित्या: गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, आमगाव, सालेकसा, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरेगाव आणि देवरी.

जिल्हा परिषद निवडणूक विभागाच्या रिक्त पदांसाठीच्या पोटनिवडणुका: रत्नागिरी- केळवली (राजापूर), सांगली- बेडग (मिरज), नाशिक- चांदवड (चांदवड), जळगाव- जानवे मंगरुळ (अमळनेर), अहमदनगर- अरणगाव (नगर).

पंचायत समिती निर्वाचक गणांच्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणुका (जिल्हा): सोलापूर दक्षिण (सोलापूर)- कुंभारी, सिन्नर (नाशिक)- माळेगाव, चोपडा (जळगाव)- चहार्डी, अक्कलकुवा (नंदूरबार)- खापर, औसा (लातूर)- तळणी, वसमत (हिंगोली)- बोरीसावंत, धारणी (अमरावती)- शिरपूर व मोगर्दा, कळमेश्वर (नागपूर)- गोंडखैरी आणि चार्मोशी (गडचिरोली)- दुर्गापूर.