लपा विभागाच्या अभियंत्याने लावली जलयुक्त शिवार योजनेची वाट

0
18

नालासरळीकरणाच्या नावावर केली अर्धवट काम
गोंदिया-सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांच्या बांधकाम हे अयोग्य नियोजनाचा उत्कृष्ट नमुना ठरले आहे.लघुपाटबंधारे विभागाचे अभियंता शेट्टी यांच्या हेकेखोर स्वभावामुळे जलयुक्त शिवार योजनेच्या कामाला काळे फासले गेले आहे.पाणी बचतीचे नियोजन आणि शेतीसह जनावरांनाही ते पाणी अधिकाधिक काळापर्यंत कसे मिळेल हा दृष्टिकोन समोर ठेवून जलयुक्त शिवार राबविण्यात येत आहे.परंतु डव्वा ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या माध्यमातून ठरवून दिलेल्या नियोजनाला ठेंगा दाखवीत कृषी सहाय्यक आणि अभियंत्याने मनमर्जीनेच कामे केली,ती सुध्दा अर्धवट स्वरूपातली असे चित्र बघावयास मिळते.
नाला सरळीकरणामध्ये पूर्ण नाल्यातील माती,केरकचरा व झाडे काढून सरळ करावयाचे आहे.परंतु डव्वा येथे करण्यात आलेल्या नाला सरळीकरणाच्या कामात एकाच बाजूचे काम करण्यात आले.आणि बंधाèयाच्या वेस्टवेअरमधून निघणाèया पाण्यासाठी मात्र रस्ता मोकळा करून दिलाच गेला नाही.तर दुसरीकडे मात्र सरळीकरणाचे काम करण्यात आले. परंतु वेस्टवेअर खुले ठेवण्यात आले अशा अनेक चुकांच्या नियोजनात जलयुक्त शिवार योजनेचे काम डव्वा येथे कृषी विभाग व लपा विभागाच्या अधिकाèयांनी केले आहे.
डव्वा हे गाव जलयुक्त शिवार फेरी योजनेअंतर्गत समाविष्ट असून शासनाच्या निर्देशाप्रमाणे ग्रा.पं. डव्वा येथे कृषीसहाय्यक धांडे,ग्रा.वि.अधिकारी,सरपचं तथा उपसरपंच सर्व सदस्य मिळून शिवार फेरी केली. सर्व कामांचा आराखडा तयार झाला. ग्रामसभा बोलविण्यात आली. ग्रामसभेमध्ये सर्व कामांना प्राथमिकतेने मंजुरी प्रदान करण्यात आली. त्यामध्ये बंधाèयाचे खोलीकरणाचे काम व गाळ काढणे व नाला सरळीकरण करण्याचा कामाला प्राधान्य देण्यात आले होते.त्यानुसार जेसीबी मशीनद्वारे, काही बंधाèयाचे खोलीकरण व गाळ काढण्याचे काम सुरू झाले.
मुख्यत्वे ज्या बंधाèयाचे गेट बंध आहेत. अशा बंधाèयाचा खोलीकरणाचे काम आदी करायला पाहिजे होते. ते लघुपाटबंधारे विभागाच्या अरेरावी पणामुळे झाले नाही. ज्या बंधाèयांना अजिबात गेटच नाही. अशा बंधाèयाचे काम मात्र या अधिकाèयांनी प्राथमिकतेने सुरू केले. संपूर्ण गावाच्या हितासाठी व पाण्याची पातळी वाढावी यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. परंतु लघू पाटबंधारे विभागातील अभियंतांच्या बेजबाबदार पणाला ही लोकाभिमुख योजना बळी पडत आहे. हे अधिकारी एवढ्यावरच थांंबले नाही तर सुरू असलेल्या कामाच्या बाबतीत ग्रा.पं.कमिटीला माहिती द्यायला सुध्दा टाळाटाळ करतात.वास्तविक ग्रा.प.च्यावतीने वारंवार वेस्टवेअर बंद असलेल्या बंधाèयाचे सरळीकरण व खोलीकरण आधी करण्याची विनंती केली परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती विलास चव्हाण यांनी दिली.बंधाèयाचा गाळ उपसा करून नाला सरळ करावा व गावातील लोकांना गुरे-ढोरे धुण्याकरिता व कपडे धुण्याकरिता जवळपास सहा महिने या पाण्याचा उपयोग होईल व गावातील विहिरींची पाण्याची पातळी वाढेल,अशी ग्रा.पं.ची भूमिका असताना त्याकडे लपा विभागाने मात्र दुर्लक्ष केले आहे.