तांदूळ निर्यातीला धोरणाचा फटका

0
7

गोंदिया दि.२८: केंद्र सरकारचे शेतकरीविरोधी धोरण आणि यंदा देशांतर्गत व विदेशात तांदळाच्या विक्रमी उत्पादनाचा फटका देशातील तांदूळ निर्यातदारांना बसला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा तांदळाच्या निर्यातीत ६० टक्के घट झाली आहे.धान खरेदीवर शेतकऱ्यांना मिळणारा २५० रुपयांचा बोनस यंदा केंद्र सरकारने बंद केल्याने खुल्या बाजारात तांदूळ मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला. परिणामी तांदळाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली. किमती कमी झाल्यानंतरही उठाव नसल्याने यंदा बहुतांश राईस मिल मालकाला ५० लाख ते ५ कोटींपर्यंत फटका बसला आहे. याशिवाय काही मिल एकाच शिफ्टमध्ये तर अनेकांनी मिल बंद केल्या आहेत. तसेच उद्भवलेल्या परिस्थितीमुळे निर्यातदारही चिंतेत आहेत. पंजाब, आंध्र प्रदेश, ओडिशा राज्यांसह भंडारा आणि गोंदिया जिल्ह्णातील ७५ टक्के राईस मिल बंद आहेत.
गेल्यावर्षी भारतातून एक कोटी टन तांदळाची निर्यात झाली होती. त्यात २० टक्के वाटा भंडारा आणि गोंदिया जिल्ह्णाचा आहे. बॉईल आणि स्टीम तांदळाची सर्वाधिक निर्यात होते. पण यावर्षी किमती कमी झाल्यानंतरही निर्यात ४० टक्के होण्याची शक्यता आहे.४तांदळाची निर्यात आॅक्टोबर महिन्यातही सुरू राहील. व्हिएतनाम, पाकिस्तान आणि लगतच्या देशांमध्ये तांदळाचे विक्रमी उत्पादन झाले. त्यामुळे या देशातून आखाती देशांत तांदळाची निर्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे, शिवाय भावही कमी आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यानंतर इराणने बासमती तांदळाची खरेदी थांबविल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.४त्यामुळे देशांतर्गत बासमती तांदळाचे भाव १३० रुपयांवरून ७० रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. यंदा बासमती तांदळाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी आणि व्यापारी चिंतेत आहेत.