एसीबीचे अधिकारी भासवून तोतयानी केली २५ हजारांची मागणी

0
11

गोंदिया दि.५: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून दोघांकडून आंगणवाडी सेविकेला गंडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. जवळील फुलचूर येथील आंबाटोली परिसरात गुरूवारी (दि.४) दुपारी ३ वाजता दरम्यान हा प्रकार घडला. प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्याचा दुसरा साथीदार मात्र पसार झाला.
आरोपी नरेश मेश्राम (४५,रा.र्मुी) व त्याचा साथीदार दिगंबर मेश्राम या दोघांनी आंबाटोली निवासी आंगणवाडी सेविका फिर्यादी मनिषा टेकेश्‍वर कटरे (४0) यांच्या घरात अनधिकृत प्रवेश केला. या दोघांनी कटरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारी असल्याचे सांगून २५ हजार रूपयांची मागणी केली. एवढेच नव्हे तर त्यांना क्षती पोहचविणार अशा धमकावणी करून त्यांच्यावर दबाव टाकला. यावर मात्र कटरे यांना संशय आल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात फोन करून सदर नावाचे इसम विभागात कार्यरत आहेत काय याची विचारणा केली. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या नावाचे इसम विभागात नसल्याचे सांगण्यात आले. यावर त्यांनी लगेच शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. लगेच शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी कटरे यांच्या घरी गेले व त्यांनी नरेश मेश्राम यास ताब्यात घेतले. मात्र त्याचा दुसरा साथीदार पसार झाला. पोलिसांनी कटरे यांच्या तक्रारीवरून भादंवीच्या कलम १७0, ३८५, ४५२, ४१९, ४२0, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
आंगणवाडी सेविकांच्या घरी जावून त्यांना किशोरवयीन मुलींना सुविधा, लाभ याशिवाय विविध प्रश्न विचारून पैशांची मागणी केली जात असल्याचा प्रकार मागील १५ दिवसांपासून सुरू असल्याचे कळले. हा प्रकार काही आंगणवाडी सेविकांसोबत घडलेला असल्याने श्रीमती कटरे व गौतम यांनाही हा प्रकाराबद्दल माहिती होती.त्यांनी लगेच प्रकल्प अधिकारी अंजली बावनकर यांना माहिती दिली,त्यांनी महिला बालकल्याण सभापती सविता पुराम यांना माहिती दिली.पुराम यांनी श्रीमती बावनकर यांच्यासोबत विभागातील 3 कमर्चारी सोबत पाठवून त्या तोतया अधिकारीना पकडण्याची सुचना केली.त्यानुसार फुलचूर येथील अंगणवाडी सेविका श्रीमती शारदा गौतम यांच्या घऱी जाऊन त्यांच्याकडे माहिती मागण्यासाठी आलेल्याना पकडण्यात आले.त्यांच्याकडे ह्युमन राईटस एनजीओ नावाचे ओळखपत्र होते ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सेटर जस्टीस एॅण्ड पीस या संस्थेचे ओळखपत्र होते.त्यांनी अंगणवाडी सेविकेवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रकल्प अधिकारी अंजली बावनकर यांनी लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधिक्षक दिनकर ठोसरे यांनी भ्रमणध्वनी करुन माहिती दिली.त्यांनीही तिथे पोचून त्यांना ताब्यात घेतले नंतर गोंदिया शहर पोलिसांच्या स्वाधीन करुन या तोतया अधिकार्‍यांचा पर्दाफाश केला.