जि.प. व पं.स. सार्वत्रिक निवडणूक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक

0
13

गोंदिया,दि.१3: गोंदिया जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सर्व आठ पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी गोंदिया जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणाकरीता निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक केली आहे.
गोंदिया तालुका- निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार संजय पवार व अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी एस.के.वालकर. आमगाव तालुका- निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार राजीव शक्करवार व अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी सी.डी.मुन. सालेकसा तालुका- निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार एन.जे.उईके व अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी एस.एन.वाघाये. गोरेगाव तालुका- निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी बकुलराव घाटे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार बी.आर.बांबोळे व अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी डी.बी.हरिणखेडे. तिरोडा तालुका- निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार रविंद्र चव्हाण व अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी नारायण जमईवार. सडक/अर्जुनी तालुका- निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार शोभाराम मोटघरे व अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी आर.जे.धांडे. देवरी तालुका- निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार संजय नागटिळक व अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी एस.एन.मेश्राम. अर्जुनी/मोरगाव तालुका- निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी एम.ए.राऊत, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार एच.आर.रहांगडाले व अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी जी.डी.कोरडे हे काम पाहतील.