विक्रीस आणलेला लाखोंचा माल उघड्यावर

0
11

साकोली दि.१४- आधारभूत धानखरेदी केंद्रात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेले लाखो रुपयांचे धान उघड्यावर पडून आहे. पावसात भिजल्यास होणारे नुकसान शेतकऱ्यांच्या माथी मारले जाईल. परंतु, त्यासाठी बाजार समिती किंवा मार्केटिंग फेडरेशनद्वारे कोणतीही उपाययोजना केली जात नाही.

येथील श्रीराम भातगिरणी मार्केटिंग फेडरेशने सब एजंट म्हणून हमीभाव धानखरेदी केंद्र चालविते. गिरणीच्या गोदामात खरीप व रब्बी हंगामात खरेदी करण्यात आलेले धान भरून ठेवले आहेत. सध्या उन्हाळी धानाची खरेदी करण्यात येत आहे. परंतु, त्यासाठी गोदामात जागा शिल्लक नाही. पूर्वी खरेदी करण्यात आलेल्या धानाची उचल किंवा भरडाईचे नियोजन मार्केटिंग फेडरेशनने केले नाही. त्यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून विक्रीसाठी आणला जाणारा उन्हाळी धान ठेवण्यासाठी गिरणीजवळ जागाच नाही. त्यामुळे गिरणीच्या आवारात धानाची पोत्यांचा ढीग तयार झाला आहे. याबाबत गिरणी व्यवस्थापक जी. बी. समरित यांनी सांगितले की, हीच स्थिती कायम राहिली तर, धानखरेदी बंद करावी लागेल. सध्या येथे पाच हजार क्विंटल धान उघड्यावर आहे. त्याचे मोजमाप झालेले नाही. पाऊस आल्यावर नुकसान झाल्यास किंवा धान चोरीला गेल्यास शेतकऱ्यांची जबाबदारी राहील. त्यासाठी श्रीराम भातगिरणी जबाबदार नाही.