‘जिप’चे १६ तर ‘पंस’चे ४0 नामांकन अपात्र

0
10

गोंदिया दि. १८: जिल्हा परिषदेच्या ५३ आणि आठ पंचायत समित्यांच्या १0६ जागांवर निवडणूक लढू इच्छिणार्‍यांनी दाखल केलेल्या नामांकनांची छाननी मंगळवारी सायंकाळपर्यंत सुरू होती. त्यात जिल्हा परिषदेच्या ४५७ नामांकनांपैकी १६ तर पंचायत समितीच्या ६५३ नामांकनांपैकी ४0 नामांकन विविध कारणांनी अपात्र ठरले आहेत.
१0 ते १५ जूनपर्यंत ऑनलाईन नामांकन दाखल करण्याची मुदत होती. ऑनलाईन नामांकन दाखल केल्यानंतर त्याची मुद्रित प्रत (प्रिंट कॉपी) निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दाखल करायची होती. पहिल्यांदाच अशा पद्धतीने नामांकन दाखल केल्यामुळे अनेकांच्या हातून काही चुका झाल्या. त्यामुळेच त्यांचे नामांकन रद्द ठरविण्यात आले. काही जण पुरेसे प्रमाणपत्र जोडू शकले नाहीत.
नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसाठी ४५७ नामांकन तर पंचायत समित्यांच्या १0६ गणांसाठी ६५३ नामांकन दाखल झाले होते. मात्र त्यापैकी अनुक्रमे १६ व ४0 अपात्र ठरल्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ४४१ तर पंचायत समित्यांसाठी ६१३ उमेदवारांचे नामांकन वैध ठरविण्यात आले आहेत.