मजूर सहकारी संस्थेवर नशिने पॅनेल विजयी,पटोले गटाचा पराभव

0
10

भंडारा दि. २६: भंडारा जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा संघ भंडारा या संस्थेची सन २0१५-१६ या कालावधीसाठी बुधवारी निवडणूक व मतमोजणी घेण्यात आली. यात कैलाश नशिने यांच्या पॅनलने विजय प्राप्त केला. त्यांचे सर्व तेराही संचालक निवडून आले.विशेष म्हणजे या निव़डणुकीत खासदार नाना पटोले गटाचे सर्व उमेदवार पराभूत झाले. सर्वाधिक ७९ मते कैलाश नशिने यांना मिळाली. ९५ मतदार असलेल्या भंडारा जिल्हा मजूर सहकारी संस्था भंडाराच्या निवडणुकीत एकूण २३ उमेदवार रिंगणात होते. वैध मतपत्रिका ९३ होत्या. यात दोन मतपत्रिका अवैध ठरल्या. त्यामुळे दोन पॅनलमध्ये सरळ लढत झाली.मतमोजणीनंतर कैलाश नशिने यांच्या पॅनलने एकहाती सत्ता प्राप्त केली. यात कैलाश नशिने यांच्यासह विलास घाटबांधे, अभिजीत वंजारी, राकेश मलेवार, फिरोज मुंडले, गंगाधर रिनके, धनराज चौधरी, भिवाजी पारधी, मिलिंद राहुल, ज्योती ब्राम्हणकर, रिना नागपुरे, बाबूराव बारबते, शैलेंद्र सतदेवे यांचा समावेश आहे.