केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज जिल्ह्यात

0
10

आमगाव येथे भव्य जाहीर सभा
गोंदिया, दि २६ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरिता रस्ते वाहतुक, महामार्ग व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांची शनिवारी २७ जून रोजी दुपारी १ वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. आमगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित सभेत पालकमंत्री राजकुमार बडोले, प्रदेश महामंत्री रामदास आंबटकर, खासदार नाना पटोले, खासदार अशोक नेते, जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले, आमदार संजय पुराम, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, माजी आमदार खुशाल बोपचे, माजी आमदार हरीश मोरे, माजी आमदार हेमंत पटले, माजी आमदार दयाराम कापगते, माजी आमदार भजनदास वैद्य, माजी आमदार खोमेश रहांगडाले, माजी आमदार केशव मानकर, माजी आमदार भेरqसग नागपुरे, प्रदेश सदस्य राकेश शर्मा, जि. प. उपाध्यक्ष मदन पटले, सभापती सविता पुराम आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा भाजपातर्फे करण्यात आले आहे.