भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदांमध्ये भाजपचा पराभव

0
20

गोंदिया जि.प.निवडणुकीत राकाँ सर्वात मोठा पक्ष
सत्ताधारी भाजपला जनतेने दिला धक्का
आजी माजी आमदार पुत्र,पुत्री व पत्नीला पराभवाचा धक्का
राष्ट्रवादीच्या राजलक्ष्मी तुरकर यांची हॅट्रीक
राकाँ च्या श्रीमती तुुरकर अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार
अध्यक्षपद ओबीसी महिलाकरीता राखीव

गोंदिया, दि. ६ – जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या ३० जून रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणीचा निकाल आज सोमवारी(दि.६)जाहिर होताच केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला मतदारांनी नाकारल्याचे चित्र समोर आले आहे.गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या मात्तबरांना पराभवाचा सामना आंतरिक मतभेदामुळे करावा लागल्याचे निकालाने उघड झाले आहे.आज झालेल्या मतमोजणीमध्ये कुठल्याही पक्षाला मात्र सत्ता स्थापनेसाठी स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशुंक परिस्थिती निर्माण झाली आहे.अशा परिस्थितीत भाजपच्या विरोधात वेगवेगळे लढलेले राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष जिल्हा परिषदेच्या सत्तेत एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्हा परिषदेच्या ५३ जागापैकी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक २० जागा पटकावल्या आहेत.त्यापाठोपाठ भाजपने १७ व काँग्रेसने १६ जागा पटकावल्या.गेल्यावेळी स्पष्ट बहुमतावर सत्तेत आलेल्या भाजपला मात्र पराभवाचा फटका बसला.

भाजपची सत्ता राहिलेल्या भंडारा िजल्हा परिषदेत भाजपला केवळ १३ जागांवर (मागील निवडणुकीत २५) समाधान मानावे लागले. सर्वाधिक १९ जागा पटकावत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे तर राष्ट्रवादीने १५ जागा मिळवून साऱ््यांनाच आश्चर्याचा जोरदार धक्का दिला. ४ जागांवर अपक्ष तर शिवसेनेला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. तर सातपैकी चार पंचायत समित्यांवर काँग्रेसने ताबा मिळविला आहे. निकाल पाहता भाजपचे स्थानिक खासदार नाना पटोले यांच्या राजकीय वर्चस्वाला त्यांच्या बालेकिल्ल्यातच सुरुंग लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गोंदिया तालुक्यातील ०६ जागा काँग्रेस,४ एनसीपी व ४ भाजप.तिरोडा तालुक्यात ६ एनसीपी व १ भाजप.गोरेगाव तालुक्यात २ काँग्रेस,१ एनसीपी व २ भाजप.आमगाव तालुक्यात १ काँग्रेस, ४ एनसीपी व १ भाजप.सालेकसा तालुक्यात २ काँग्रेस,१ भाजप व १ एनसीपी.सडक अर्जुनी तालुक्यात १ काँगेस,२ एनसीपी व २ भाजप.देवरी तालुक्यात ३ काँग्रेस व २ भाजप तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात १ काँग्रेस ,२ एनसीपी व ४ भाजपने जागा qजकल्या.राष्ट्रवादी काँग्रेसचा देवरी तालुका वगळता सर्वच तालुक्यात खाता उघडला गेला आहे.
पंचायत समितीच्या निवडणुकीत गोंदिया पंचायत समितीच्या २८ जागापैकी काँग्रेस १५,भाजप ७,एनसीपी ५ व अपक्ष १.तिरोडा पंचायत समितीच्या १४ जागापैकी राष्ट्रवादी काँगे्रस ९ व भाजप ५,काँग्रेस-०.देवरी पंचायत समितीच्या १० जागापैकी,भाजप ५,काँग्रेस २ ,एनसीपी १ व शिवसेना २.सालेकसा पंचायत समितीच्या ८ जागापैकी ३ भाजप,४ काँग्रेस व १ एनसीपी.आमगाव पंचायत समितीच्या १२ जागापैकी ४ भाजप,३ काँग्रेस व ५ एनसीपी.गोरेगाव पंचायत समितीच्या १० जागापैकी ५ भाजप,३ काँग्रेस,१ एनसीपी व १ अपक्ष.अर्जुनी मोरगाव पंचायत समितीच्या १४ जागापैकी ७ भाजप,३ काँग्रेस,४ एनसीपी.तर सडक अर्जुनी पंचायत समितीच्या १० जागापैकी ७ भाजप,१ काँग्रेस व २ एनसीपीने जागा पटकावल्या.सडकअर्जुनी या पालकमंत्र्याच्या गृहतालुक्याची पंचायत समिती व गोरेगाव फक्त भाजपने स्पष्टबहुमताने qजकली आहे.

फडणवीस, गडकरींना धक्का
विदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप कमजोर असताना २०१० च्या निवडणुकीत भाजपने प्रथमच भंडारा व गोंदिया या दोन जिल्हा परिषदांवर आपला झेंडा फडकावला होता. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या रूपाने विदर्भ सत्तेचे मोठे केंद्र बनले आहे. दोन्ही नेते प्रचारातही सहभागी झाले होते. या दोन्ही नेत्यांच्या दृष्टीने ही निवडणुक अप्रत्यक्षपणे प्रतिष्ठेची ठरली होती. मात्र, मतदारांनी या नेत्यांना जोरदार धक्का दिला. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रामुख्याने राष्ट्रवादीपुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होत्या. त्यासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी संपूर्ण राजकीय कसब पणाला लावून राष्ट्रवादीची कामगिरी उचलावल्याचे मानले जात आहे.

भंडारा जिल्हा परिषद (५२ जागा)
काँग्रेस–१९
राष्ट्रवादी काँग्रेस-१५
भाजप-१३
अपक्ष-४
शिवसेना-१

गोंदिया जिल्हा परिषद (५३ जागा)
राष्ट्रवादी काँग्रेस २०
भाजप १७
काँग्रेस १६