मॉर्निंग वॉकला गेलेल्या तिघांना भरधाव कारने चिरडले
काश्मीरमध्ये 17 जवान हुतात्मा
श्रीनगर – उत्तर काश्मीरमधील उरी शहरात रविवारी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांसह घुसखोरी करत दहशतवाद्यांनी एका बटालियन मुख्यालयावर हल्ला केला. यामध्ये 17 जवान हुतात्मा झाले असून 19 जण जखमी झाले. दरम्यान, जवानांना चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
सूत्रांकडून प्राप्त माहितीुसार, सकाळी चारच्या दरम्यान दहशतवादी हल्ल्याबरोबर स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि चकमक सुरू झाली. येथून 102 किलोमीटर अंतरावर आणि लष्कराच्या ब्रिगेड मुख्यालयापासून काही मीटर अंतरावर असलेल्या उरीमध्ये हा हल्ला झाला.
दरम्यान, मारले गेलेले दहशतवादी “जैशे महम्मद‘ या संघटनेचे होते आणि त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा होता, अशी माहिती लष्करी मोहिमेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणबीरसिंह यांनी दिली. त्याचप्रमाणे दहशतवाद्यांकडील साहित्य पाकिस्तानमधील असल्याचे स्पष्ट होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्या वेळी डोगरा रेजिमेंटचे जवान एका तंबूत झोपले होते. स्फोटामुळे या तंबूला आग लागली आणि ती जवळपासच्या बराकींमध्येही पसरली, असे सूत्रांनी स्पष्ट केले. यामध्ये 17 जवान हुतात्मा झाल्याची माहिती लष्कराच्या नॉर्दर्न कमांडने दिली. अन्य 19 जवान जखमी झाले असून, सुमारे पाच तासांच्या चकमकीनंतर या चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. दरम्यान, जवानांची शोधमोहीम सुरू असल्याची माहिती लष्कराने एका निवेदनाद्वारे दिली. आम्ही 17 जवानांच्या हौतात्म्याला सलाम करतो, असेही यामध्ये म्हटले आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि लष्करप्रमुख जनरल दलबिरसिंह सुहाग हे तातडीने काश्मीरला रवाना झाले. गृह मंत्रालयानेही परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. उच्चस्तरीय बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गृह सचिव, उच्च लष्करी, निमलष्करी आणि गृह मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते.
जलयुक्त शिवार योजनेमधून चामोर्शीतील १४ गावांचे सिंचन करणार-खासदार अशोक नेते
गडचिरोली, दि.१७: रेगडी येथील कन्नमवार जलाशयाचे पाणी न मिळणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील १४ गावांना जलयुक्त शिवार योजनेतून पाणी देण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना खा. अशोक नेते यांनी आज संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.
रेगडी-घोट परिसरातील १४ गावांच्या प्रलंबित सिंचन समस्याचे निराकरण व उपाययोजना करण्यासाठी खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी ए.
एका नक्षल्यास अटक, तिघांचे आत्मसमर्पण
चक्रीघाटात दोन बसेसची धडक, 20 प्रवासी प्रवासी
मराठा आरक्षणासंदर्भात बोलण्यापेक्षा कृतीची जास्त गरज- शरद पवार
मुंबई, दि. 17 : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात बोलण्यापेक्षा कृतीची जास्त गरज आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. राज्यकर्त्यांनी केवळ ‘समाजाच्या भावनांशी सहमत आहोत’ असे म्हणून चालणार नाही. राज्यकर्त्यांनी कृती करायला हवी, असे सांगत पवार यांनी सत्ताधारी भाजपला टोला लगावला. मी राज्यकर्ता नाही. माझ्या हातात काही अधिकार नाहीत. त्यामुळे ज्यांच्या हाती अधिकार आहेत, त्यांनी कृती करायलाच हवी, असे पवार यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत राज्यभरात विविध मागण्यांसाठी मराठा समाजाकडून काढण्यात येत असलेल्या मोर्च्यांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलताना आपली भूमिका सविस्तरपणे मांडली. शेती आणि आरक्षणाबाबतची सरकारी अनास्था मराठा समाजाच्या उद्रेकास कारणीभूत आहे. अशावेळी राज्य सरकारने चर्चेत वेळ काढण्यापेक्षा ठोस निर्णय घेतले पाहिजेत. ज्यांच्या हाती सूत्रे आहेत, त्यांच्याकडून काही निर्णयच घेतले जात नाहीत, अशावेळी जनता रस्त्यावर उतरते, असे सांगत पवार यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला. मात्र, सध्याच्या मोर्चांमध्ये संयम आहे. त्यामुळे निर्णय प्रक्रियेतील लोकांनी या सगळ्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, असेही पवार यांनी सांगितले.
अॅट्रॉसिटीचा काही प्रमाणात गैरवापर – फडणवीस
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा शिक्षणसम्राटांच्या मक्तेदारीसंदर्भात केलेल्या आरोपांनाही पवार यांनी मुलाखतीदरम्यान प्रत्युत्तर दिले. मराठा नेत्यांनी अनेक खासगी संस्था काढल्या, स्वत:ची संस्थाने उभी केली. मात्र, या शैक्षणिक संस्थांमध्ये किती गरीब आणि मध्यमवर्गीय मराठा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला, याची शहानिशा व्हायला पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले होते. त्यासाठी खासगी शिक्षणसंस्थांच्या मक्तेदारीवर टाच आणण्याचेही संकेत फडणवीस यांनी दिले होते. मात्र, सरकारने शिक्षण संस्था ताब्यात घेणे हा मूर्खपणा असल्याचे पवारांनी सांगितले. ज्यांनी कष्टाने या संस्था उभ्या केल्या,त्यांना लोकांनी पाठिंबा दिला होता. त्यांनी स्वत:च्या खिशातून या संस्था उभ्या केलेल्या नाहीत. त्यांना जनतेचा पाठिंबा होता. यात शिकणार्यांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा अधिक समावेश आहे, असे पवार यांनी म्हटले.
पाळ फुटून शेकडो एकरातील धानपीक बुडाले
वरठी : मोहगाव शेतशिवरातील लघु पाटबंधरे विभागाच्या तलावाची पाळफुटली. तलावाच्या पाण्यामुळे परिसरातील ५ किमी अंतरावरच्या पिकांना फटका बसला आहे. या भागातील ३0 ते ४0 शेतकर्यांच्या २00 एकरातील धानपीक पाण्याखाली असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
वरठी गावालगत लघु पाटबंधारे विभागाचे दोन तलाव आहेत. १९८0 च्या दशकातील हे तलाव दुर्लक्षीत आहेत. मागील ३५ वर्षापासुन या तलावाकडे लघु पाटबंधारे विभागाने पाहले नसल्याचा आरोप शेतकर्यांनी केली आहे. देखभाल दुरूस्ती नसल्यामुळे तलावाच्या एका भागात अनेक दिवसांपासून पाणी वाहत होते. नहराचे पाणी सुरू असल्यामुळे तलावात पाणी भरून होते. आज शुक्रवारला दुपारपासून तलावाच्या पाळीची माती निघणे सुरू झाले होते. त्यातून कमी प्रमाणात पाणी वाहत होते. सायंकाळच्या सुमारास तलावाच्या पाळीच्या मोठय़ा भागाने जागा सोडल्यामुळे तलावातील पाणी शेतात शिरले. काही वेळेपुरते संपुर्ण परिसर पाण्यात बुडाले होते. अजुनही शेकडो एकर शेती पाण्याखाली असुन या शेतातील पीक नष्ट झाले आहे.
या तलावाच्या परिसरात वरठी, मोहगाव, सोनुली येथील शेतकर्यांची शेती आहे. यात पुरूषोत्तम मरघडे, वामन मरघडे, रामप्रसाद मरघडे, भाग्रता देशमुख, झिंगर मरघडे, मंगर मरघडे, प्यारेलाल मरघडे, गुलाब वाल्मीक, लक्ष्मण थोटे, वामन थोटे, शामराव थोटे, नामदेव थोटे, संतोष थोटे, राजु भाजीपाले, विश्वकांत भुजाडे, चंद्रकांत भुजाडे, शशिकांत भुजाडे, पवनदास मेo्राम, दामोधर गायधने, शिवा गायधने, भिवा गायधने, सुधाकर गायधने, गंगाधर गायधने यांच्यासह अन्य शेतकर्यांचे शेतपिक पाण्यात बुडाले आहे. तलावाची पाळ फुटल्यानंतर प्रत्यक्ष भेटीदरम्यान वरठीचे सरपंच संजय मिरासे यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या तलावाची पाळ फुटल्याचा आरोप केला
सामाजिक न्याय मंत्र्यांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन मागे
मुंबई, दि. 17 : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी
दिलेल्या आश्वासनानंतर विविध मागण्यांसाठी सामाजिक न्याय विभागातील
कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पुकारलेले लेखणी बंद आंदोलन आज मागे घेतले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील अधिकारी व कर्मचारी
यांनी 12 सप्टेंबर 2016 पासून विविध प्रलंबित मागण्यांबाबत लेखणी बंद
आंदोलन सुरू केले होते. यासंदर्भात विविध कर्मचारी संघटनांनी बरोबर आज
सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री श्री. बडोले यांच्या अध्यक्षतेखाली
बैठक झाली. त्यावेळी श्री. बडोले यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत
सकारात्मक विचार करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर संघटनांनी आंदोलन
मागे घेत असल्याचे श्री. बडोले यांना सांगितले.
या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सचिव डॉ. सुरेंद्रकुमार
बागडे, बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त
एल. बी. महाजन, राजपत्रित संघटनेचे अध्यक्ष माधव झोड, महासचिव नितीन ढगे,
कार्याध्यक्ष राजेश वाघ, समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शांताराम
शिंदे, सचिव सुजित भांबुरे, बार्टीचे प्राध्यापक बी. टी. मुळे यांच्यासह
राजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेचे सदस्य तसेच समाज कल्याण कर्मचारी
संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. बडोले म्हणाले की, शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या विशेष
चौकशी पथकाच्या चौकशीसंदर्भात मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा झाली असून
त्यांनी सकारात्मक आश्वासन देऊन मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत. तसेच
कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात प्राधान्याने
विचार करण्यात येईल. कर्मचारी भरतीमध्ये झालेल्या गैरप्रकाराच्या
चौकशीसंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. तसेच जिल्हा जात पडताळणी
समितीसाठी पदांच्या निर्मितीसाठी सुधारित आकृतीबंध तयार करण्यात येऊन
आवश्यक ती पदे मंजूर करण्यात येतील. तालुकास्तरावरील समाज कल्याण
अधिकाऱ्यांबाबत सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे,
असेही श्री. बडोले यांनी यावेळी सांगितले
कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या इतर मागण्यासंदर्भात सकारात्मक विचार
करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सामाजिक न्याय मंत्री श्री. बडोले यांनी दिलेल्या
आश्वासनानंतर अधिकारी व कर्मचारी संघटनेचे समाधान झाले असून लेखणी बंद
आंदोलन मागे घेण्यात येत आहे, असे राजपत्रित संघटनेचे अध्यक्ष माधव झोड
यांनी यावेळी जाहीर केले.
शाळेत तंबाखूजन्य पदार्थ खाऊन जाणारे शिक्षक निलंबित होणार
berartimes.com,गोंदिया,दि.१६ – शाळेत तंबाखूजन्य पदार्थ खाऊन व दारु पिऊन जाणाऱ्या शिक्षकांना ताबडतोब निलंबित करावे, त्यांची बढती व पुरस्कार काढून घ्यावेत, असे आदेश शिक्षण संचालकांनी दिल्याने शिक्षकांमध्ये खळबळ माजली आहे.
पुणे येथील शिक्षण संचालनालयातील उपसंचालक(प्राथमिक) शरद गोसावी यांनी १४ सप्टेंबर २०१६ रोजी सर्व शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांना एक पत्र पाठविले आहे. राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांना तंबाखू, खर्रा, सिगारेट व दारु पिण्यास बंदी घालण्याबाबतचे हे पत्र आहे. मुंबईतील खार(प) येथील संकल्प युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणिक भवार यांनी शिक्षकांमध्ये असलेल्या व्यसनाधितनेबाबत ३ फेब्रुवारी २०१६ रोजी एक लक्षवेधी पत्र शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला पाठविले होते. या पत्राचा संदर्भ देऊन शिक्षण संचालकांनी व्यसनाधीन शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील शाळांमधील शिक्षक तंबाखू, विडी, खर्रा, दारु इत्यादी पदार्थांचे सेवन करुन शिकवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचे अत्यंत वाईट परिणाम विद्यार्थ्यांवर होऊन तेदेखील हळूहळू व्यसनाधीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही विद्यार्थी व्यसनाधीनही झालेले आहेत. ग्रामीण भागात अशा शिक्षकांचे प्रमाण जास्त असल्याचे माणिक भवार यांनी आपल्या निवेदनात नमूद केले होते. अशा शिक्षकांवर कठोर कारवाई करुन त्यांची बढती, शिक्षक पुरस्कार तसेच शासनाच्या सुविधांपासून त्यांना वंचित करावे, शिवाय जे शिक्षक आदेशाचे पालन करणार नाहीत, त्यांना ताबडतोब निलंबित करावे, असे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत.
विशेष म्हणजे, शिक्षकांच्या व्यसनाधीनतेबाबतचा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनातही उपस्थित करण्यात आला होता. त्याचा अहवालही देणे शासनाला अपेक्षित आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांची एकूण संख्या, तंबाखू, विडी, खर्रा, दारु व पानाचे सेवन करुन शिकवत असलेल्या शिक्षकांची संख्या, कारवाई केलेल्या शिक्षकांची संख्या अशाप्रकारच्या तक्त्यात माहिती भरुन शिक्षणाधिकाऱ्यांना संचालकांना अहवाल पाठवावा लागणार आहे. या आदेशाची किती प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
खासदार दत्तकग्राम पाथरीतील विकासकामात भ्रष्टाचार-नागरिकांचा आरोप
berartimes.com,गोंदिया,दि.१६ -जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील पाथरी हे गाव खासदार दत्तक ग्राम योजनेतर्गंत विकासाकरीत राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दत्तक घेतले.त्या गावाच्या विकासासाठी खा.पटेलांनी आपल्या खासदारनिधीसह अदानी फाऊडेंशनच्या सीएसआर व शासकीय योजनेच्या इतर निधीची कामे प्रस्तावित केली. खासदार आदर्श ग्राम पाथरीची निवड प्रफुलभाईंनी करताच संपूर्ण गावकèयांनीही आपूलकीने व एकजुटीने लोक सहभाग दिला.खासदार पटेलांनी घेतलेल्या प्रथम आढावा बैठकीतच तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अमीत सैनी आणि पत्रकारांसमोर गावात होणारी विकास कामे दर्जेदार व गुणवत्तेदार व्हावी, अशी सुचना दिली होती.मात्र ग्राम पंचायतीची सत्ता स्वतःकडे काबिज होण्यापुर्वी खा. पटेल यांचे प्रतिनिधी गोरेगाव पंचायत समितीचे सदस्य केवल बघेले यांनी आपुलकीचा ढोंग रचत गावामध्ये ग्रामपंचायत निवडणूक न घेता निर्विरोध व्हावी,अशी गावकèयांची अपेक्षा असतांना सुध्दा स्वतःचा स्वार्थासाठी गावात स्पर्धात्मक निवडणूका बघेलेंमुळे झाल्या.ग्रामपंचायतीत सत्ता येताच खासदार पटेलांच्या प्रतिनिधी पदाचा दुरूपयोग करून स्वतःचा आर्थिक विकास करण्यासाठी, विकास कामात भ्रष्टाचाराची मर्यादा ओलांडत व नियमांना कायद्याला तिलांजली देत मनमर्जीने हिटलरशाही वागणुक सुरु केल्याचा आरोप पाथरीवासिय नागरिकांनी आज शुक्रवारला येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केला.
तसेच खासदार दत्तकग्राम मध्ये झालेल्या मग्रारोहयोतंर्गतच्या कामासह अदानीच्यावतीने करण्यात आलेल्या खोलीकरण कामातील मातीतून सपाटीकरण करण्यात आले आणि त्या सपाटीकरणाच्या माध्यमातून सुमारे १२ लाख रुपयाचा निधीची विल्हेवाट लावत भ्रष्टाचार केल्याचा आरोप उपसरपंच संजय कटरे,प्रकाश कटरे,भोजराज कटरे,नाहिद कुरेशी,कुसमन उरकुडे,उमाकांत चन्ने,संजय चन्ने आदींनी केला आहे.तसेच याप्रकरणाची चौकशी जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाने येत्या आठ दिवसात न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
इंदिरा आवास योजनेखाली आपले जवळच्या लोकांना जे या पुर्वी लाभ घेवून अपात्र झाले अशांना त्याच दारिद्रयरेषेखालील क्रमांकावर दुसèयांदा लाभ देवून इतर गरजूना लाभापासून वंचित केल्याचेही म्हटले आहे. दलीत वस्ती सुधार योजनेमध्ये ग्रामपंचायत पाथरीचे जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक आल्याने ५ लक्ष रूपयाचे पारितोषिक मिळाले. त्यामध्ये सरपंच व खासदर प्रतिनिधी केवल बघेले यांनी दलीत वस्तीमध्ये कोणतेही काम न करता गा्रमपंचायतच्या समोर बाजार चैकात ग्राउंड व मुख्य प्रवेशव्दार तयार केले. त्यामूळे वार्ड क्र. ३ मध्ये राहणाèया दलित बांधवांवर अन्याय करून शासकिय परिपत्रकास तिलांजली दिल्याचे उमाकांत चन्ने यानी सांगितले. एमआरईजीएस अंतर्गत झालेले विकास कामामध्ये तलाव खोलीकरण,फिश टँक ६,५०,३०० पाथरी, फिŸश टँक भुताईटोला ६,५०,३०० , भुताईटोला दहन भुमी अशोक गौधर्य रस्ता ९,६६,१००, इदगाह सपाटीकरण ६,८५,१००, दरगा सपाटीकरण ९,१२,८०० अदानी तर्फे खोलीकरण ५,४० हजाराचे कामात साप्ताहिक हजेरी पट तयार करतांना दहनभुमी सपाटीकरण भुताईटोलामध्ये ३० ते ३५ मजुरांचे बोगस नावे घालून मजुरीचे पैसे लाटल्याचा आरोप केला.त्याचप्रमाणे तलाव खोलीकरण विकास कामामध्ये अदानीकडून खोलीकरण केले, यात फिश टँक खोलीकरण कामाची माती, सिप्टिंग इदगाह सपाटीकरण दरगाह सपाटीकरण, दहनभुमी सपाटीकरण, इत्यादींवर वापर करून लाखो रूपयाचा भ्रष्चार तांत्रिक अभियंता विजय रहागंडालेच्या माध्यमातून केल्याने तांत्रिक अभियंता विजय रहागंडाले याच्यावर सुध्दा कारवाई करुन नोकरीतून बडतर्फे करावे अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.
खासदार निधीतून झालेले सिमेंट कॉक्रींट रस्ते, चिखलावर कांक्रिट बेस न करता ४० एमएम गिट्टी घालून बनवण्यात आले हे सर्व रस्ते निकृष्ट दर्जाचे बनविण्यात आले.या कामाची पाहणी सुध्दा अभियत्यांने केली नसल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. आदर्श गाव पाथरी येथे मुख्य विकास समिती बनविण्यात आली. व प्रत्येक वार्ड विकास समिती बनवण्यात आल्या,मात्र गेल्या २ वर्षात कधीच या समित्यांची सभा घेण्यात आली नाही आणि विकास कामे करतांना समितीला विश्वासात घेण्यात आले नसल्याचे सांगत खासदार प्रतिनिधी हे हिटलरप्रमाणे वागत असल्याचा आरोप केला आहे