38.6 C
Gondiā
Monday, May 19, 2025
Home Blog Page 5693

न्या. डॉ. मंजूला चेल्लूर यांनी घेतली मुख्य न्यायाधीशपदाची शपथ

0

मुंबई, दि. २२ – कलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावरून बदलीवर आलेल्या न्या. डॉ. मंजुला चेल्लूर यांनी आज राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी समारंभात मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी न्या. डॉ. मंजुला चेल्लूर यांना पदाची शपथ दिली.
राज्यपालांच्या पत्नी विनोदा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान सभेचे सभापती हरिभाऊ बागडे, कॅबिनेट मंत्री विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, राम शिंदे, जयकुमार रावल, महादेव जानकर, राज्यमंत्री दीपक केसरकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या काळजीवाहू मुख्य न्यायाधीश विजया कापसे ताहिलरामाणी, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, वरिष्ठ शासकीय अधिकारी व इतर मान्यवर शपथविधीला उपस्थित होते. सुरुवातीला मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी मुख्य न्यायमुर्तींच्या नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखविली. राष्ट्रगीताने शपथविधीची सुरुवात व सांगता झाली.
दिनांक ५ डिसेंबर १९५५ रोजी बल्लारी येथे जन्मलेल्या मंजुळा चेल्लूर यांनी बल्लारीच्या महिला महाविद्यालयातून कला स्नातक ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी १९७७ साली त्यांनी बंगलोर येथील रेणुकाचार्य विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी प्राप्त केली. सन १९७८ साली त्यांनी वकिलीची सुरुवात केली.

गायीला ‘माता’ मानण्याचा सल्ला देणारे अाहेत कोण? -शरद पवार

0

पुणे- ‘गायीला आई न म्हणणाऱ्यांनी देश सोडून जावे, असे देशातल्या एका मुख्यमंत्र्याकडून ऐकायला मिळाले. गायीचा आदर आम्ही सर्वच जण करतो. पण आमच्या आईच्या जागी गायीला माता म्हणण्याचा आदेश द्यायचा अधिकार यांना कोणी दिला? देश यांच्या मालकीचा आहे का,’ असा सवाल माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केला.
ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृह राज्यमंत्री डॉ. भाई वैद्य यांना पवारांच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार देऊन गाैरविण्यात अाले. या वेळी अध्यक्षपदावरून पवार बाेलत हाेते. ‘त्रिदल’च्या वतीने गेल्या २८ वर्षांपासून हा पुरस्कार दिला जाताे. संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष खासदार शरद यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज, ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्ड आदींची प्रमुख उपस्थिती हाेती. ‘त्रिदल’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी प्रास्ताविक केले.
‘देशाची स्थिती आज बिकट आहे. काश्मीर धुमसतो आहे. काश्मीर समस्येने स्वातंत्र्यानंतर देशाला सर्वाधिक त्रास दिला आहे. सत्य बोलण्यावर बंधने आली आहेत. लोकांच्या भावना कशानेही दुखावू लागल्या आहेत. सामाजिक विषमतेचा देशाचा सर्वात जुना आजार कायम आहे. काही लोक अजूनही विसाव्या शतकातच जगत आहेत. चीन, युरोप कुठे पोचला आणि आपण कुठे याचा विचार करावा लागेल,’ याकडे शरद यादव यांनी लक्ष वेधले.
डॉ. वैद्य म्हणाले, की ‘इसिसच्या रुपाने धर्मवादाचा धोका जगभर धुमाकूळ घालतो आहे. भारतातही धर्माधिष्ठित राजकारणाची भूमिका मांडणारे लोक आहेत. जगभर भयानक विषमता निर्माण झाली आहे. या आव्हानांचा सामना तरुणांना करावा लागणार आहे. आर्थिक वितरण आणि जात निर्मूलनाचे कामही तरुणांना करायचे आहे.’

लायन्स क्लब राईस सिटी तर्फे ध्वजारोहण

0

वृक्षारोपण व देशभक्ती गीत स्पर्धा उत्साहात
गोंदिया – लायन्स क्लब राईस सिटी व हेल्प लाईन संघटना गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण करून तिरंगा झेंड्याला मानवंदना देण्यात आली. तसेच स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम व देशभक्ती गीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाले.
एमआयडीसी परिसरात स्व. अमृतलाल कोठारी फॅक्टरीच्या प्रांगणात संस्थेच्या अध्यक्षा लायन नीलम बग्गा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तदनंतर लायन सुशील सिंघानिया यांच्या फॅक्टरी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आले. या नंतर वाधवा यांच्या फॅक्टरी परिसरात देशभक्ती गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. यात शालेय विदयार्थी व संस्थेच्या सदस्यांनी सहभाग घेऊन स्पर्धेला यशस्वी केले. कार्यक्रमाला प्रामुख्याने लायन्स क्लबच्या अध्यक्षा लायन नीलम बग्गा,सचिव लायन अनिता बिसेन, कोषाध्यक्ष लायन अजितसिंग बग्गा, प्रोजेक्ट चेयरमेन लायन अनिल वाधवा ,हेल्प लाईन अध्यक्ष जगदीश मिश्रा, ला.प्रेम मुंदळा, ला.राजेंद्र बग्गा, ला. भरत क्षत्रिय, ला.अजय जैसवाल,ला.प्रदीप जैसवाल, ला.राजू बिसेन, ला.रायकवार, ला.अर्चना कोठारी, ला.प्रकाश पटेल,ला.पुष्पक जसानी, ला.रीता जैसवाल, ला.शशि वाधवा, ला.वंदना साहू, ला.शकुन रायकवार, पदम् लुनिया, कुँवरसिंह भारद्वाज, मनमोहन गुप्ता ,प्रदीपसिंग् ठाकुर, गणेश चौहान, सुरेन्द्र सोनी, ला.नरेश साहू,ला.सुरेन्द्र पारधी आदींसह शालेय विधार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जय’ जिवंत नाही-खा.पटोले

0

भंडारा: जिल्हयातीलच नव्हे तर राज्यासह राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेला वाघ ‘जय’ याची शिकार करण्यात आली असुन तो जिवंत नसल्याचे खा.नाना पटोले यांनी सांगीतले.तसेच या सर्व प्रकाराला वन विभाग पुर्णपणे जबाबदार असुन त्याची तक्रार पं्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे करून ‘जय’ प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे खा.नाना पटोले यांनी विश्रामगृहात आयोजित पत्रकारपरिषदेत सांगीतले. आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ असलेला ‘जय’ याची अज्ञातांकडुन शिकार करण्यात आली आहे.मात्र वनविभाग त्या संदर्भातील तथ्य पुढे न आणता निरर्थक गोष्टींचा आधार घेत ‘जय’ जिवंत असल्याचा देखावा करीत आहे.‘जय’ च्या नसण्याला पुर्णपणे वनविभाग जबाबदार असुन या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी सुध्दा खा.पटोले यांनी केली. ‘जय’ हा उमरेड-कºहांडला अभयारण्यात येणाºया पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र होते.‘जय’ ला बघण्याकरीता देश-विदेशातुन पर्यटक येत असत त्यामुळेच एका वर्षात शासनाला २४ कोटी रूपयाचे भांडवल प्राप्त झाले होते.तसेच उमरेड-कºहांडला अभयारण्य परिसरातील बेरोजगारांना बºयापैकी रोजगार प्राप्त झाला होता.मात्र मागील दोन-तीन महिन्यापासुन ‘ज़य’ उ म् ा र े ड – क º ह ा ं ड ल् ा ा अभयारण्यातुन बेपत्ता असल्याने पर्यटकांनी अभयारण्याकडे पाठ फिरविली आहे.त्याचा फटका शासनाच्या महसुलावर बसत असून परिसरातील बेरोजगारांच्या रोजगाराचा सुध्दा प्रश्न निर्माण झाला आहे.

‘जय’ याने अभयारण्यातुन स्थलांतरण केले असल्याचे वन विभागातर्फे सांगीतले जात असले तरी ‘जय’ ची शिकार झाली असून तो जिवंत नाही हीच वास्तविकता असल्याचे खा.नाना पटोले यांनी सांगीतले.या प्रकरणी काही दिवसातच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवुन या विषयी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचेसुध्दा सांगीतले. सध्या जिल्हयातील धान पिकावर लष्करी अळींचा प्रादुर्भाव दिसुन येत असून त्यामुळे मोठया प्रमाणात पीकांची हानी झाली आहे.त्याकरीता शेतकºयांनी पिक विमा योजनेअंतर्गत संबंधित तालुका कृषी विभागाकडे दोन प्रतित अर्ज सादर करावे असे आवाहनही खा.पटोले यांनी केले. विरोधकांकडुन भंडारा जिल्हयातील गोसेखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पातुन वगळण्यात आल्याचा अपप्रचार सुरू असुन गोसेखुर्द हा आजही राष्ट्रीय प्रकल्प आहे आणि त्याकरीता केंद्र सरकारने निधी दिला असून लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होणर आहे.देशात एकुण ११ राष्ट्रीय प्रकल्प असुन त्यामध्ये गोसे खुर्द या प्रकल्पाचा सुध्दा समावेश असल्याचे खा.पटोले यांनी सांगीतले.गोसे खुर्द प्रकल्पाच्या बांधकामात मोठया प्रमाणात अनियमितता आढळुन आल्याने मागील पास ते सहा वर्षापासुन केद्र सरकारने गोसे खुर्द प्रकल्पाला निधी नाकारला होता.मात्र केदं्रीय समितीने गोसे प्रकल्पाचा आढावा घेत राज्य सरकारला गोसे खुर्द प्रकल्पाच्या बांधकामामध्ये झालेल्या अनियमितता सुधारण्याचे आदेश दिल्याने राज्य सरकारने ते दुरूस्त केले आणि त्यामुळेच केंद्र सरकारने गोसे खुर्द प्रकल्पासाठी निधी मंजुर केला असुन २०२०-२१ पर्यंत गोसे खुर्द प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येणार असल्याचे खा.नाना पटोले यांनी यावेळी सांगीतले.तुमसर तालुक्यातील बावनथडी योजनेकरीता केंद्राच्या प्रधानमंत्री जलसिंचन योजनेअंतर्गत १७०० कोटी रूपये मंजुर झाले असून बावनथडी प्रकल्प लकवरच पुर्णत्वास येणार असल्याचे खा.पटोले सांगीतले.

तेलंगणामध्ये बस कालव्यात कोसळली, 9 जणांचा मृत्यू

0

वृत्तसंस्था
हैद्राबाद, दि. 22 – तेलंगणामधील खम्मम जिल्ह्यात खासगी बस पुलावरुन कालव्यात कोसळून अपघात झाला आहे. सोमवारी पहाटे हा अपघात झाला. अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून 15 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त बस हैद्राबादहून खम्मम जिल्ह्याकडे चालली असताना हा अपघात झाला. खम्माम जिल्ह्यामधीलच नागार्जूनसागर कालव्यात बस कोसळली आहे.

वीरेन्द्र जायसवाल ने एमएलसी हेतू केंद्रीय मंत्री गडकरी को आवेदन सौंपा

0

नागपुर। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के निवासस्थान पर एड. वीरेन्द्र जायसवाल ने भंडारा-गोंदिया विधान परिषद चुनाव हेतू भाजपा की उम्मीदवारी मिलने हेतू केंद्रीय मंत्री गडकरी को आवेदन सौंपा। भंडारा के वरिष्ठ भाजपा नेता डा. प्रकाश मालगावे, गोंदिया न.प. बांधकाम सभापती बंटी पंचबुध्दे भी उनके साथ थे।
एड. वीरेन्द्र जायसवाल ने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी को भंडारा-गोंदिया विधान परिषद चुनाव के संदर्भ में विशेष जानकारी भी दी।
एड. वीरेन्द्र जायसवाल ने इस आवेदन की प्रतिलिपी भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित शाह, प्रदेश भाजपा अध्यक्ष श्री रावसाहेब दानवे, महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेन्द्रजी फड़णवीस, सांसद नाना पटोले, भाजपा अध्यक्ष भंडारा जिला मो. तारीक कुरैशी, भाजपा अध्यक्ष गोंदिया जिला श्री हेमंतजी पटले व पालकमंत्री श्री राजकुमार बडोले को प्रेषित कर भंडारा-गोंदिया विधान परिषद से भाजपा की उम्मीदवारी मिलने हेतू निवेदन किया है।

चौकशी समिती गठीत :शिंगाडा तलाव सौंदर्यीकरणात गैरव्यवहार?

0

गोंदिया,दि.22 : तिरोड्यातील सिंगाडा तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या ८ कोटी रुपयांच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत प्राप्त तक्रारीच्या आधारे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकार्‍यांनी दोन सदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे. अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते हे या समितीचे अध्यक्ष तर जिल्हा कोषागार अधिकारी दिगंबर नेमाडे सदस्य आहेत. या द्विसदस्यीय समितीला महिनाभरात आपला अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर करायचा आहे.विशेष म्हणजे याच प्रकरणाला घेऊन नगरसेवक देवेंद्र तिवारी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.परंतु न्यायालयाने ती याचिका फेटाळत लघुपाटबंधारे विभागाला तलावासंबधी माहिती देण्याचे निर्देश दिले होते.
तिरोडा नगर परिषदेच्या वतीने तेथील सिंगाडा तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम केले जात आहे. ८ कोटी रुपयांच्या या कामात निविदा प्रक्रियेत व सौंदर्यीकरणाच्या कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार तिरोडा येथील सुनील कुंभारे व इतर तिघांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्यात नगर परिषदेचे अध्यक्ष, नगरसेवक व मुख्याधिकारी यांच्यावर कायदेशिर कारवाईची मागणी करण्यात आली. त्यानुसार उपायुक्त (महसूल) तथा प्रभारी अधिकारी, नगर परिषद प्रशासन नागपूर यांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांना सदर कामाची चौकशी करण्यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकारी गोंदिया यांना दिले.
जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी याप्रकरणी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी दोन सदस्यीय समिती नेमून त्यांना वस्तुस्थितीदर्शक अहवाल एक महिन्यात सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय बाहेर येते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

केंद्राकडून तूरडाळसाठा उचलण्यात महाराष्ट्राची हाराकिरी

0

नवी दिल्ली : डाळींच्या दरवाढीचा मुद्दा संसदेत आणि विधानसभांमध्ये गाजल्यानंतरही राज्यांनी केंद्राकडून मंजूर झालेला डाळसाठा घेण्याकडे पाठ फिरवली आहे. यामध्ये भाजपशासीत महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात ही राज्ये अव्वल आहे. तब्बल 7000 टन तूरडाळीची मागणी करणाऱ्या महाराष्ट्राला 4352 टन डाळसाठा मंजूर झाला आहे. पण प्रत्यक्षात फक्त 87.29 टन डाळच राज्याने केंद्राकडून घेतली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार ऑगस्टच्या मध्यापर्यंत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगाण, छत्तीसगड, बिहार, अंदमान आणि निकोबार, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, हरियाना या राज्यांनी तब्बल राज्यांची मासिक मागणी 47 हजार टन तूरडाळीची आहे. केंद्राने बफरसाठ्यातून 29 हजार टन साठा देण्याचे मंजूर केले. प्रत्यक्षात फक्त साडेसहा हजार टनांच्या आसपास साठाच राज्यांनी घेतला आहे. अर्थात, केंद्राकडे 9800 टन तूरडाळीचे पैसे राज्यांनी जमा केले आहेत.
सरकारकडे डाळींचा जवळपास दोन लाख टनांचा बफरसाठा असूनही डाळींच्या महागाईचे माध्यमांमध्ये झळकणारे आकडे आणि राज्य सरकारांकडून डाळ साठा उचलण्याकडे होत असलेले दुर्लक्ष केंद्राच्या चिंतेचा विषय ठरले आहेत. यामुळे राज्यांच्या उदासीनतेबद्दल केवळ हतबलता व्यक्त करण्याऐवजी आता बाजार हस्तक्षेप योजनेमार्फत डाळसाठा बाजारात आणण्याबाबत पर्यायी योजनेवर सरकार विचार करत आहे. किरकोळ आणि घाऊक बाजारातील डाळींच्या दरातील तफावतीबद्दलही केंद्राने राज्यांना खडसावले आहे. राज्यांमध्ये ही तफावत सात ते 32 टक्‍क्‍यांपर्यंत पोचली आहे.

सुकमा में साप्ताहिक बाजार में ब्लास्ट, एक जवान घायल, एक नक्सली ढेर

0

सुकमा। जिले के एर्राबोर साप्ताहिक बाजार में नक्सलियों ने एक आईईडी ब्लास्ट किया जिसमें सीआरपीएफ का एक जवान घायल हो गया। घटना के बाद फा‍यरिंग में एक वर्दीधारी नक्सली के मारे जाने की बात कही जा रही है। घायल जवान का नाम दिलीप कुमार बोरे है, जिन्हें इलाज के लिए अस्पताल में भर्ती करवाया गया है।

जानकारी के मुताबिक सीआरपीएफ की दो बटालियन साप्ताहिक बाजार में ड्यूटी पर गई थी। इस दौरान नक्सलियों ने उन्हें निशाना बनाकर धमाका कर दिया। घटना में जवान के पैर में चोट आई है। घटना के बाद इलाके के ग्रामीणों में दहशत फैल गई है। उधर सुरक्षाबलों ने आस-पास के इलाकों में नक्सलियों को पकड़ने के लिए सर्चिंग शुरू कर दी। एर्राबोर थाना क्षेत्र में सर्चिंग के दौरान तीन आईईडी और बरामद किए गए, जिन्हें मौके पर ही डिफ्यूज कर दिया गया।

नारायणपुर में नक्सलियों ने लगाए बैनर-पर्चे

नक्सलियों ने रावघाट खदान के विरोध में बैनर और पर्चे लागए। बैनर के साथ बम लगे होने की आशंका है। बैनर के साथ विधुत तार है लटका हुआ मिला, नक्सलियों ने खोड़गांव में जगह-जगह बैनर लगाए हैं।

इनामी नक्सली ने किया समर्पण

1 लाख के इनामी नक्सली सहित 7 नक्सलियों ने एसपी के सामने आत्मसमर्पण किया। एक नक्सली ने हथियार के साथ किया समर्पण किया है। किसकोडो एरिया में ये नक्सली सक्रीय थे, आगजनी तोड़फोड़ जैसी घटनाओ में रहे है शामिल।

मंत्री जी के हाथों साइकिल चाहिए…तो लगाओ झाड़ू

0

रायपुर/अम्बिकापुर। प्रदेश में सरकारी स्कूलों में शिक्षा की हालत वैसे ही खराब है और ऐसे में शायद जिम्मेदार अफसरों को लगता है कि बेटियां पढ़-लिखकर करेंगी क्या झाड़ू ही लगा लें। मामला सरगुजा जिले के चेंद्रा का है।

यहां नए थाना भवन का उद्घाटन करने गृहमंत्री आने वाले थे और साथ ही उनके हाथों सरकारी स्कूल की छात्राओं को सरस्वती योजना के तहत साइकिल का वितरण होना था।

नए थाना भवन में गंदगी पसरी थी। साइकिल की आस में आई छात्राओं को अफसरों ने कहा मंत्री जी के हांथों साइकिल चाहिए ना…तो झाड़ू लगाकर सफाई कर दो और छात्राओं के हाथों में झाड़ू पकड़ा दी।

थाना भवन में अफसर से लेकर सिपाही तक सीना ताने व्यवस्था का मुआयना कर रहे थे और छात्राएं उनके बीच झाड़ू लगा रही थीं। इसके बाद गृहमंत्री राम सेवक पैंकरा आए और छात्राओं को साइकिलें बांटीं। यह घटना 20 अगस्त की है।

इसका वीडियो वायरल होने के बाद आज यह मामला सामने आया। जिस समय छात्राएं झाड़ू लगा रही थीं, वहां जिला पुलिस के आला अधिकारियों का पूरा महकमा मौजूद था। कार्यक्रम के दौरान छात्राओं को कई घंटे भूखे-प्यासे मैदान में भी बैठाए रखा।