33.5 C
Gondiā
Wednesday, May 15, 2024
Home Blog Page 5223

दिव्यांग शिबिरात दिव्यांगाचीच हेळसांड

0

खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.3 -अपंग वित्त विकास महामंडळाअंतर्गत दिव्यांग स्वावलंबन शिबिर ३० जुलै रोजी स्थानिक सामाजिक न्याय भवनात आयोजित करण्यात आले होते. शिबिराची वेळ ही सकाळी अकराची होती. त्या आधीच २ हजारांवर दिव्यांग शिबिरस्थळी हजर झाले.परंतु ज्यांच्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.त्या दिव्यागांचीच हेळसांड या शिबिरात करण्यात आली.ज्यांच्या नावावर राजकारण करण्यासाठी खटाटोप करणारे शिबिराचे उदघाटक असलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्रीच थेट सायंकाळी साडेचारला पोचले. यावरून त्यांना दिव्यांग पाल्यांची किती काळजी आहे, हे स्पष्ट होते. शिबिरस्थळी असुविधांचा फटकाही दिव्यांगांना बसला.त्याचा निषेध म्हणून या दिव्यांगानी काळ्या फिती लावून आपल्या भावना व्यक्त केल्य़ाचे आकाश मेश्राम,दिनेश पटले,चंद्रशेखर कुंभरे,सागर बोपचे,सविता चौधरी,राखी चुटे यांनी सांगितले.
हिरमूसलेले चेहरे घेऊन दूरवरून आलेले हे दिव्यांग सायंकाळी परत आपल्या घरी निराशाने गेले.काही दिव्यांगानी दिलेल्या माहितीनुसार सडक अर्जुनी येथे आयोजित शिबिरातही थट्टा करण्यात आली.बसस्थानकापासून दीड किलोमीटर दिव्यांग्यांना त्रास सहन करत जावे लागले परंतु छायाचित्र काढून आपली स्तुती करवून घेणार्या पालकमंत्र्यासह जिल्ह्याधिकार्ंयानाही आमची दया आली नाही असे सांगत यांच्याकडून काय अपेक्षा असे विचार दिव्यांगाच्या मनात घर करुन बसले आहे.
अपंगांची सेवा हीच ईश्वर सेवा. ही सेवा करून मी धन्य झालो, त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव राहू असे म्हणणारे लोकप्रतिनिधी आपल्याच जिल्ह्यात आहेत. परंतु, केवळ शिबिरापुरते, कार्यक्रमापुरते त्यांचे हे मत असते. कार्यक्रम आटोपले की, त्यांना बोललेल्या शब्दांचा विसर पडतो. हे तितकेच सत्य आहे. असेच एक दिव्यांग स्वावलंबन शिबिर येथील सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात ३० जुलैला आयोजित करण्यात आले होते. या शिबिरातून अपंगत्वाचे प्रमाणपत्र, तपासणी, रेल्वे पास यासारखे कागदपत्रे तयार करून मिळणार होती. शिबिराची वेळ ही सकाळी अकराची ठरली होती. त्या आधीच जवळपास २ हजारांवर दिव्यांग शिबिरस्थळी उपस्थित झाले. मात्र, शिबिरात पोहोचताच दिव्यांगांना पहिला फटका असुविधांचा बसला. नियोजनाचा अभाव ही डोकेदुखी ठरली. वरिष्ठ अधिकाèयांचे कोणतेही नियंत्रण नव्हते. तपासणी करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची चमू जागेवर नव्हती. रेल्वे पास वाटप करणारे स्टॉल कुठेही दृष्टीस पडले नाही. व्हील चेअरची सुविधा नसल्यामुळे दिव्यांगांसोबत आलेल्या त्याच्या सहकाèयाला किंवा पालकाला दिव्यांगांना खांद्यावर मांडून शिबिरस्थळी पोहोचवावे लागले. पिण्याच्या पाण्याची सोय तर, सोडाच साधा ग्लासदेखील नसल्याने कोरडा घसा घेऊन दिव्यांगांना राहावे लागले. असे असतानाही शरीराने व्यंग असलेले दिव्यांग शिबिरस्थळी आपल्याला प्रमाणपत्र, रेल्वेपास आणि काही योजनांची माहिती मिळेल म्हणून, आतुरतेने वाट पाहात होते.
मात्र, यात काहीच साध्य झाले नाही. जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी असलेले ना. राजकुमार बडोले हे देखील सायंकाळी साडेचारला शिबिरस्थळी हजर झाले. त्यांनी दिव्यांगांना स्फुर्ती मिळेल, असे भाषण ठोकले आणि निघून गेले. मात्र, या भाषणातून काय साध्य होईल, असा प्रश्न पडतो. भाषण, आश्वासने खूप झालीत, कृती करा, आम्हाला दया नको, संधी द्या असा सूरही शिबिरात आलेल्या दिव्यांगांमधून उमटला.

जिल्ह्यात सरासरी ५४९.२ मि.मी.पाऊस

0

२४ तासात ३८.१ मि.मी.पाऊस
गोरेगाव तालुक्यात अतिवृष्टी
गोंदिया,दि.३ : जिल्ह्यात १ जून ते ३ ऑगस्ट २०१६ या कालावधीत १८१२४.१ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी ५४९.२ मि.मी. इतकी आहे. आज ३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात १२६८.५ मि.मी. इतका पाऊस पडला असून त्याची सरासरी ३८.१ मि.मी. इतकी आहे. गोरेगाव तालुक्यात गोरेगाव मंडळ विभागात ८७ मि.मी., कुऱ्हाडी मंडळात ५८.३ मि.मी. व मोहाडी मंडळात ११०.३ मि.मी. पाऊस पडला, असा एकूण तालुक्यात सरासरी ८५.२ मि.मी. पाऊस पडल्याने अतिवृष्टी झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.
३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता पर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढील प्रमाणे असून त्याची सरासरी कंसात दर्शविण्यात आली आहे. गोंदिया तालुका- २०८ मि.मी. (२९.७), गोरेगाव तालुका- २५५.६ मि.मी. (८५.२), तिरोडा तालुका- ९३ मि.मी. (१८.६), अर्जुनी मोरगाव तालुका- ७६ मि.मी. (१५.२), देवरी तालुका- १४४ मि.मी. (४८.०), आमगाव तालुका- २४८.६ मि.मी. (६२.१), सालेकसा तालुका- १७३ मि.मी. (५७.७) आणि सडक अर्जुनी तालुका- ७०.१ मि.मी. (२३.४) असा एकूण १२६८.५ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी ३८.१ मि.मी. इतकी आहे.

सभापतींच्या भेटीत भरनोलीची शाळा कुलूपबंद

0

दोषी शिक्षकांवर कारवाई होणार : वरिष्ठांकडे पाठविला प्रस्ताव
संतोष रोकडे
अर्जुनी मोरगाव/ इटखेडा, दि. ३ : अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर यांनी २८ जुलैला भरनोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली. या वेळी शाळा चक्क कुलूपबंद असल्याचे दिसले. त्यामुळे संतप्त झालेल्या सभापतींनी दोषी शिक्षकांवर कारवाई करावी, असा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. खुद्द शिक्षकांनींच शिक्षणाचा खेळ मांडल्याचे तालुक्यात दिसून येते. तथापि, याच माहितीच्या आधारावर सभापती अरविंद शिवणकर यांनी २८ जुलै रोजी सायंकाळी सव्वाचारला भरनोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आकस्मिक भेट दिली. या वेळी शाळा कुलूपबंद असल्याचे दिसले. दरम्यान, त्यांनी तत्काळ गावकèयांकडे चौकशी केली. गावकèयांनी सकाळपासूनच शाळा बंद असल्याचे सांगितले. त्याचप्र‘ाणे राजोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेलाही भेट दिली. सहायक शिक्षक रवींद्र दाणी व डी. डी. वंजारी हे अनुपस्थित आढळले. मुख्याध्यापक गहाणे हे शाळेत नव्हते. शाळेच्या वेळेत मुख्याध्यापक व दोन साहायक शिक्षक हलचल रजिस्टरवर कसलीही नोंद न करता शाळेतून निघून गेले. या बाबत सभापती शिवणकर यांनी गंभीर दखल घेतली असून, दोषी शिक्षकांवर कठोर कारवाई करावी, असा प्रस्ताव त्यांनी वरिष्ठांकडे पाठविला आहे. वरिष्ठ आता काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

महाड-पोलादपूर पूल दुर्घटना;विधानसभा अध्यक्षांचे चौकशी करण्याचे निर्देश

0

मुंबई दि 3: रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीच्या पुरात मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानचा पूल वाहून गेला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विभागामार्फत या घटनेची सखोल चौकशी करावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिले.

रायगड जिल्ह्यात घडलेल्या दुर्घटनेला आता काही तास उलटले आहेत. दरम्यान या दुर्घटनेत बेपत्ता झालेले प्रवासी आणि वाहनांचा शोध घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. आज सकाळी विधानसभेत विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या दुर्घटनेबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक ती सर्व कार्यवाही तातडीने करावी अशी मागणी केली होती. यावर सार्वजनिक
बांधकाममंत्री (सार्व. उपक्रम वगळून) चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील ब्रिटीशकालीन पुलांचे सर्वेक्षण आयआयटीमार्फत केले जाईल असे सांगितले. जे धोकादायक पूल असतील त्यांच्यावरील वाहतूक बंद केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

चंद्रपूर येथील उड्डाणपुलाचे काम मार्च 2017 अखेर पूर्ण करण्यात येईल-प्रवीण पोटे-पाटील

0

चंद्रपूर दि.3 : चंद्रपूर येथील जाम-चंद्रपूर-आसिफाबाद मार्गावरील रेल्वे लेव्हल क्रॉसिंग 93 वर उड्डाणपुलाचे काम मार्च 2017 अखेर पूर्ण करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम वगळून) राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.या संदर्भातील प्रश्न आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला होता. विधानसभा सदस्य ॲड. संजय धोटे, विजय वडेट्टीवार, जयदत्त क्षीरसागर, गणपतराव देशमुख यांनी या संदर्भातील प्रश्न विचारला होता.

श्री. पोटे-पाटील म्हणाले की, चंद्रपूर येथून जाणाऱ्या जाम-चंद्रपूर-आसिफाबाद मार्गावर राजुरापासून 2 किलोमीटर अंतरावरील दिल्ली-चेन्नई रेल्वे मार्गावरील लेव्हल क्रॉसिंग 93 वर उड्डाणपुलाच्या
बांधकामाला सन 2008-09 मध्ये मंजुरी मिळाली होती. दिनांक 20 मार्च 2010 रोजी 17 कोटी रुपये रकमेच्या कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या रेल्वे उड्डाण पुलाचे काम भारतीय रेल्वेमार्फत आणि जोडरस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. रेल्वेमार्फत हाती घेण्यात आलेल्या रेल्वे पुलाचे काम करण्यास विलंब झाला असला तरी सदर
कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जोडरस्ते व त्यामधील व्हायाडक्टचे काम करणे शक्य झालेले नाही. या कामासाठी आतापर्यंत 18.69 कोटी रुपये इतकी रक्कम खर्च झाली आहे. या पुलाची किंमत वाढली असून ती 24.53 कोटी रुपये इतकी अपेक्षित आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.
प्रकल्पाच्या कामास सुधारित मान्यता प्राप्त झाल्यावर व रेल्वेमार्फत पुलाचे काम पूर्ण झाल्यावर जोड रस्त्याची उर्वरित कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

महाड पुल दुर्घटना युध्दपातळीवर शोधमोहिम सुरु

0

अलिबाग दि.3 :- मुंबई गोवा महामार्गावरील महाड पोलादपूर दरम्यानच्या सावित्री नदीवरील पुल काल रात्री 11.30 च्या दरम्यान पुराच्या पाण्यामुळे वाहून गेला आहे. यामध्ये दोन एस.टी.बसेस तसेच काही खाजगी गाडया वाहून गेल्या असण्याची शक्यता आहे. त्याबाबत शोध मोहिम युध्द पातळीवर सुरु आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, मुंबई गोवा महामार्गावरील महाड बिरवाडी जवळ
सावित्री नदीवरील जुना पुल वाहून गेल्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास कळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने घटनेचे गांर्भीय लक्षात घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले तसेच पोलीस अधिक्षक मो.सुवेज हक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी
महाडच्या प्रांत श्रीमती सुषमा सातपुते व त्यांच्या सहकार्यांनी परिस्थिती हातळण्यास सुरुवात केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय हे रात्री
पासूनच घटनेची माहिती घेऊन लक्ष ठेवून आहेत. तसेच या दुर्घटनेचे
गांभीर्य लक्षात घेता हवाई दलाचे हेलिकॉप्टर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद
दल, नौदल, तटरक्षक दल यांची मदत घेण्यात आली. 35 पोहणारे स्थानिक नागरीक,7 रिव्हर राफटिंग टिम यांच्या मदतीने शोध कार्यास प्रारंभ करण्यात आला.

या दुर्घटनेत एस.टी. महामंडळाची जयगड- मुंबई बस क्र.एम.एच.20 डी.एल.1538 व राजापूर-बोरीवली बस क्र. एम.एच.40 एन.9729 या दोन बस तसेच इतर काही खाजगी वाहने वाहून गेल्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्रीरायगड प्रकाश महेता, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सा.उपक्रम) एकनाथ शिंदे तसेच विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील सांय. 4 च्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले आहेत.

चंद्रकांत पाटील यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा – अजित पवार

0

वृत्तसंस्था
मुंबई, दि. ३ – महाडमधील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे जोरदार पडसाद बुधवारी विधानसभेमध्ये उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी या दुर्घटनेसाठी राज्य सरकारला जबाबदार ठरवत याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यावर हत्येचा (३०२) गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली.
या दुर्घटनेला सरकारचा बेजबाबदरपणा कारणीभूत असून, नवीन पुलावरुन वाहतूक सुरु असताना जुन्या पुलावरुन वाहतूक बंद का केली नाही ? असा सवाल अजित पवार यांनी विचारला. तसेच या घटनेची न्यायायलयीन चौकशी करून कठोर कारवाई करा अशीही मागणी केली.

खोट्या अॅट्रासिटीच्या तक्रारीसह 307 चा गुन्हा मागे घेण्याची मागणी

0

गोंदिया,दि.3 : दोन वर्षांपासून झेरॉक्सच्या दुकानाची उधारी देण्यास टाळाटाळ करणाèया राजेंद्र बडोले यांना पुजा झेरॉक्सचे मालक गिरजाशंकर मेंढे यांनी पैशाची मागणी करीत मारहाण केली. मात्र, राजेंद्र बडोले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सालेकसा पोलिसांनी अ‍ॅटॉसिटींतर्गत गुन्हा दाखल केला. उधारीचे प्रकरण पोलिस निरीक्षकांना देखील माहित असताना आणि कुठलीही शिविगाळ झालेली नसतानाही पोलिसांनी चुकीच्या पध्दतीने दाखल केलेला अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा व 307 ची कलम रद्द करुन जातीय सलोखा टिकवून ठेवून ओबीसी व दलीत समाजात संभ्रम चुकीच्या तक्रारीमूळे तणाव निर्माण करुन व्देषभावना बाळगणार्याविरुध्द कारवाई करण्यात यावे.तसेच याप्रकरणा सर्व सामान्य असलेल्या एका दुकानदाराला राजकीय बळी करण्याचा सुरु असलेल्या प्रयत्नाचा विरोध गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी डाॅ.विजय सुर्यवंशी व पोलिस अधिक्षक डाॅ.भुजबळ यांना निवेदन देऊन करण्यात आले आहे.
या आधी सुध्दा चुकीच्या पध्दतीने गंगाझरी पोलीस ठाणेतर्गंत कवलेवाडा येथे ओबीसी बांधवाना चुकीच्या पध्दतीने गोवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही ओबीसी संघर्ष कृती समितीने त्या घटनेचा विरोध केला होता या घटनेतही उधारी पैशाचा विषय असताना विनाकारण दोन समाजात आपल्या स्वार्थासाठी अॅट्रासिटीचा वापर करणे योग्य नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
दाखल केल्यामुळे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप करण्यात येत आहे. असा आरोप सालेकसा तालुक्यातील व्यापाèयांनी केला. यासंदर्भात रविवारी(ता.३१) शहरातून मोर्चा काढून पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.
गिरजाशंकर मेंढे यांचे सालेकसा येथे पुजा झेरॉक्स नावाने स्टेशनरीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानातून पूर्ती पब्लीक स्कूलचे संस्थापक राजेंद्र बडोले यांनी दोन वर्षांपूर्वी साहित्य खरेदी केले. ते साहित्य उधारीवर खरेदी केले. उधारीचे १ लाख ७४ हजार रुपये राजेंद्र बडोले यांच्याकडे होते. वारंवार पैशांची मागणी करून देखील राजेंद्र बडोले यांनी पैसे दिले नाही. त्यामुळे गिरजाशंकर मेंढे यांनी तालुक्यातील राजकीय मंडळींकडे धाव घेतली. सालेकसा पोलिस ठाण्यात १४ ऑगस्ट २०१५ रोजी तक्रार देखील दिली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस निरीक्षकांनी दोन्ही पक्षांना बोलावून समज दिली होती. राजेंद्र बडोले यांनी टप्प्याटप्प्याने पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. परंतु, अद्याप पैसे परत केले नाही. दुकानाकडे फिरकणे देखील बंद केले. माझे पैसे परत कर, असे म्टले असता राजेंद्र बडोले यांनी कशाचे पैस्े असे म्हटल्यामुळे गिरजाशंकर मेंढे यांनी २८ जुलै रोजी राजेंद्र बडोले यांना मारहाण केली. परंतु, राजेंद्र बडोले यांनी जातीवाचक शिविगाळ करुन जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी सालेकसा पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदविला. पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा राजकीय सूड बुद्धीतून असल्याचा आरोप करून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्यात यावा. व्यापाèयांना संरक्षण देण्यात यावे, या मागणीला घेवून तालुक्यातील व्यापाèयांनी रविवारी(ता.३१) शहरातून मोर्चा काढून पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले होते.माजी मंत्री भरतभाऊ बहेकार यांचा मेंढे हा भाचा असल्यामुळे त्याला राजकीय रुप देण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत.मात्र वास्तविकता ही तेथील व्यापारी बंधुना असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.तसेच योग्यप्रकारी चौकशी,जिल्हा शल्यचिकित्सकाकडून तपासणी आदी गोष्टीची मागणी करीत चुकीच्या पध्दतीने अॅट्रासिटीचा वापर होऊ नये अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.यावेळी बबलू कटरे,मनोज मेंढे,खुमेंद्र मेंढे,खेमेंद्र कटरे,जितेश राणे,सावन बहेकार,कैलास भेलावे,जगदिश रहागडाले,जिवनलाल शरणागत,इंद्रराज बिसेन,मुकुंद धुर्वे,मनोहर मेश्राम आदी उपस्थित होते.

संजय पुराम : शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा!

0

देवरी :केंद्र व राज्य शासनातर्फे सुरु असलेल्या लोक कल्याणकारी योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना योग्य मार्गदर्शन करा व जनतेचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करा असे निर्देशात्मक प्रतिपादन आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी केले.
येथील आफताब मंगल कार्यालयात उपविभागीय अधिकारी (राजस्व) कार्यालयाच्यावतीने आयोजित ‘महसूल दिन’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी सूनील सूर्यवंशी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार,भाजपा तालुकाध्यक्ष व नगरसेवक यादोराव पंचमवार, जि.प. सदस्य उषा शहारे, देवरीचे तहसीलदार संजय नागरीकर, सालेकसाचे तहसीलदार प्रशांत सांगडे, आमगावचे तहसीलदार साहेबराव राठोड, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी, खंडविकास अधिकारी डॉ. कोळेकर उपस्थित होते.
महसूल विभागाचे दैवत देव पामलेदार, महात्मा गांधी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन व माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रा.अंजनकर यांनी, महसूल सप्ताहानिमित्त आयोजीत महिला सक्षमीकरण कार्यक्रमावर मार्गदर्शन करीत महसूल दिनाचे महत्व पटवून दिले. सुनील सूर्यवंशी यांनी, महसूल विभागाच्या सर्व योजनांची इत्थंभूत माहिती देत विभागाची कार्यप्रणाली, महसूल सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांच्या आयोजनाविषयी माहिती दिली.
प्रास्ताविक तहसीलदार नागरीकर यांनी मांडले. संचालन प्रा.गजानन अंजनकर यांनी केले. आभार तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी महसूल विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची करणार पक्षाध्यक्षाकडे मुत्तेमवार तक्रार

0

नागपूर,दि.2 : वेगळ्या विदर्भावर काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,नारायण राणे,राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर काँग्रेसचे बडे नेते विधान भवनात मोठे वादळ निर्माण करीत असताना, दुसरीकडे या प्रकरणावरून काँग्रेसचे विदर्भातील नेते माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी विदर्भाला पाठिंबा देत पक्षाने विदर्भाबद्दल अशी भूमिका मांडण्याची सूचनाच दिलेली नसताना केलेल्या गोंधळाबद्दल पक्षा अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडेच तक्रार करणार असल्याचे मुत्तेमवार यांनी आज स्पष्ट केले.

वेगळ्या विदर्भावरून नारायण राणे, राधाकृष्ण विखे-पाटील आदींनी काँग्रेसविरोधी भूमिका मांडत असल्याची तक्रार सोनिया गांधी यांच्याकडे करणार असल्याचं विलास मुत्तेमवार यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात बोलत होते.काँग्रेसची भूमिका ही वेगळ्या विदर्भाला पाठिंबा देण्याची आहे. पण स्वस्त प्रसिद्धीसाठी राज्यातले नेते अखंड महाराष्ट्राचा ठराव आणण्याची तयारी करत असल्याची टीका मुत्तेमवारांनी केली.