29.4 C
Gondiā
Monday, April 29, 2024
Home Blog Page 5224

जमीन खरेदीत खडसे यांची अडचण वाढली

0

मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना गैरव्यवहार प्रकरणांत एकामागोमाग एक “क्‍लीन चिट‘ दिली जात आहे. मात्र. पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदीच्या प्रकरणात त्यांची अडचण वाढली आहे. सदर जमीन खडसे त्यांच्या धर्मपत्नी मंदाकिनी खडसे व गिरीश चौधरी यांनी अनधिकृतपणे खरेदी केल्याचे विधान परिषदेत लेखी उत्तरात सरकारने मान्य केले. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. हे प्रकरण “सीबीआय‘कडे वर्ग करण्याची मागणी केली.

उद्योगमंत्री सुभाष देसाई याचे उत्तर देताना सारवासारव करत होते. या वेळी मात्र सभागृहात उपस्थित भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी मूग गिळून गप्प बसणेच पसंत केले. भोसरी एमआयडीसी जमिनीच्या व्यवहाराचा तारांकित प्रश्‍न संजय दत्त, शरद रणपिसे, धनंजय मुंडे आदींनी विचारला होता. या प्रकरणात जमीन बेकायदा खरेदी केल्याचे निदर्शनात आल्यानंतर निवृत्त न्या. डी. एस. झोटिंग यांची चौकशी समिती नियुक्‍त करण्यात आली आहे. या चौकशीचा अहवाल सप्टेंबर महिन्यात आल्यानंतर गुन्हा घडला असेल, तर शिक्षा केली जाईल, असे मोघम उत्तर सुभाष देसाई यांनी दिले. तसेच या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत सातबारावर जमिनीची नोंद केली जाणार नसल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले. मात्र जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची विरोधकांची मागणी मान्य न करत चौकशी समितीचा अहवाल आल्यावर निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

देसाई या प्रश्‍नाला उत्तर देत असताना, सभागृह नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सभागृहात उपस्थित होते. जमिनीच्या या व्यवहाराविषयी महसूलमंत्र्यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी केली; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने सुभाष देसाई लेखी चौकटीत उत्तर देत राहिले.

‘बाबरी’तील पक्षकार हाशिम अन्सारी यांचे निधन

0

अयोध्या – अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर या प्रकरणी न्यायालयात मुस्लिमांची बाजू मांडणारे सर्वांत जुने पक्षकार हाशिम अन्सारी (वय 96) यांचे आज (बुधवार) पहाटे निधन झाले.

हाशिम अन्सारी यांनी फैजाबादमधील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. अन्सारी हे 22-23 डिसेंबर, 1949 मध्ये अयोध्येतील वादग्रस्त वास्तूमध्ये मुर्ती ठेवण्यात आल्यानंतर अन्सारी हेच पहिले पक्षकार होते. अन्सारी हे 1959 पासून बाबरी मशीदप्रकरणी मुस्लिमांच्या बाजूने लढत होते. 1975 मध्ये आणीबाणी लागू झाल्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती. त्यांना 8 महिने कारागृहात काढावे लागले होते. अयोध्येत आंदोलनादरम्यान तणाव असताना लोकांना शांततेचे आवाहन करणारे अन्सारी यांना हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तितकाच सन्मान मिळत होता.

अन्सारी यांनी अनेकवेळा न्यायालयाबाहेर जाऊन हिंदू धर्मगुरुंची भेट घेऊन हा मुद्दा मिटविण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना यश आले नाही. बाबरी प्रकरणाचे राजकारण करण्यात आल्यामुळे नाराज झालेल्या अन्सारी यांनी 2014 मध्ये हा खटला न लढवण्याची घोषणा केली होती.

संघाची माफी मागण्याचा प्रश्नच नाही- कॉंग्रेस

0

नवी दिल्ली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया पक्षातर्फे देण्यात आली.

आपल्या विधानाच्या समर्थनासाठी ते योग्य वेळी ऐतिहासिक तथ्ये आणि पुरावे सादर करतील. अशा प्रकारची सूचना यापूर्वीही करण्यात आली होती, मात्र ती राहुल यांनी फेटाळून लावली होती, अशी माहिती कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे त्याविषयी अधिक बोलणे उचित होणार नाही, असे सुरजेवाला म्हणाले.

महात्मा गांधींच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याचा आरोप करणारे कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने “संघाची माफी मागा; नाही तर खटल्याला तोंड द्या‘ असे फटकारले आहे. तर, कॉंग्रेसने या निमित्ताने पुन्हा एकदा धर्मनिरपेक्षतेचा पत्ता खेळण्याचे ठरविले असून, “राहुल गांधी माफी मागणार नाहीत, न्यायालयात ऐतिहासिक पुरावे सादर करतील‘, असे बजावले आहे.

देवाटोला ग्रा.प.मध्ये भ्रष्टाचार-देवकी मरई

0

देवरी,दि.20 : देवरी पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या देवाटोला ग्रामपंचायत येथील सोनारटोला येथे मग्रारोहयो अंतर्गत पाईपलाईन पुलाच्या बांधकामात भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप पं.स. सभापती देवकी मरई यांनी केला आहे.
सदर कामात रोजगारसेवक आणि ग्रामपंचायतद्वारे नियमबाह्य बोगस मजुरांची नावे टाकून शासनाचा निधी अफरातफर करण्यात आला आहे. सभापती मरई यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करून सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
पंचायत समिती सभापती देवकी मरई यांनी आपल्या तक्रारीत म्हटले, २३व २९ जून २0१६ रोजी त्यांनी स्वत: कामाच्या ठिकाणी भेट दिली असता दोन्ही वेळेस रोजगार सेवक उपस्थित नव्हते. रोजगार सेवक नसल्यामुळे मजुरांचे मस्टर, अंदाजपत्रक व भेटपुस्तिका उपलब्ध नव्हते.
या वेळी सभापतीद्वारे मजुरांना विचारले असता त्यांनी सांगितले की, जे मजूर कामावर येतच नाहीत, अशा बोगस मजुरांची मस्टरवर हजेरी लावण्यात येत असून पैसे घेण्यात येत आहेत.ग्रामपंचायतला भेट देण्यासाठी गेले असता ग्रामपंचायत कार्यालयसुद्धा बंद होते. त्यामुळे खरी माहिती सभापतींना मिळाली नाही. त्यांनी कामावरील प्रथम मजुरास सांगितले की रोजगार सेवकांना मस्टर व अंदाजपत्रक घेवून पंचायत समितीला येण्यास सांगा. परंतु अजुनपर्यंत रोजगार सेवक माहिती घेवून पोहोचलेच नाही. त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले.
सदर कामात रोजगार सेवक व मग्रारोहयोचे अधिकारी दोषी असल्याचा आरोप पंचायत समितीचे सभापती देवकी मरई यांनी केला आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ७ ऑगस्टला महाअधिवेशन नागपूरात

0

गोंदिया,दि.20-विदर्भातील सर्व ओबीसी संघटनांनी मिळून तयार केलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने येत्या ७ ऑगस्ट रोजी नागपुरातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात एक दिवसीय ओबीसी महाधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.अधिवेशन चार सत्रामध्ये आयोजित करण्यात आले आहे.
या महाधिवेशनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे.स्वागताध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य बबनराव तायवाडे राहणार असून महाधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी प्रा.या.वा.वडस्कर राहणार आहेत.प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर,नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,माजी राज्यमंत्री व विधानसभेचे गटनेते आमदार विजय वड्डेटीवार,खासदार रामदास तडस,खासदार नाना पटोले,खासदार राजीव सातव,आमदार सुनील केदार,आमदार रवी राणा,माजी आमदार पांडुरंग ढोले,सेवक वाघाये उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
यावेळी बहुजन ओबीसी चळवळीत आपले योगदान देणारे बहुजन संघर्षचे नागेश चौधरी,माजी मंत्री सुधाकर गणगणे,प्रा.मा.म.देशमुख व बबनराव फंड यांचा सत्कार करण्यात येणार आहे.यावेळी सचिन राजूरकर हे प्रास्ताविक करणार असून प्रा.कोमल ठाकरे संचालन करणार आहेत. आभार खे‘ेंद्र कटरे ‘ानतील.
सकाळी ११.३० वाजता आयोजित ओबीसी शिष्यवृत्ती व नॉनक्रिमिलेयर समस्या आणि एकविसाव्या शतकातील ओबीसी युवकासमोरील आव्हाने या विषयावरील चर्चासत्रात ओबीसी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर,यशदाचे राष्ट्रीय प्रशक्षक अ‍ॅड.गणेश हलकारे हे प्रमुख वक्ते असून प्रा.जेमिनी कडू अध्यक्षस्थानी राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ.आर.जी.टाले, महात्मा फुले समता परिषदेचे विदर्भ संघटक प्रा.दिवाकर गमे,सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष प्रा.अशोक चोपडे,प्रा.अरुण पवार,दिनेश चोखारे,नितीन मते,रविकांत बोपचे,सलिल देशमुख,डॉ.राजेश ठाकरे,भूषण दडवे उपस्थित राहणार आहेत.या सत्राचे संचालन युवक समितीचे प्रमुख मनोज चव्हाण तर आभार विद्यार्थी प्रमुख निकेश पिणे करतील.
दुपारी २.३० वाजता आयोजित ओबीसी शेतकèयांची समस्या व उपाय या विषयावरील द्वितीय सत्रात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे,कृषीतज्ञ अमिताभ पावडे मार्गदर्शन करणार तर गोंदिया ओबीसी कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे हे अध्यक्षस्थानी राहतील.यावेळी अरुण पाटील मुनघाटे,रमेश मडावी,बबनराव नाखले,अविनाश काकडे,प्रा.देवानंद कामडी पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून संचालन शरद वानखेडे हे करणार तर आभार गोqवद वरवाडे करतील.
सायंकाळी ४.३० वाजेच्या तृतीय सत्रामध्ये ओबीसी महिला व सामाजिक परिवर्तन या विषयावर बीडच्या सुशीलाताई मोराळे, नागपूरच्या नंदाताई फुकट मार्गदर्शन करतील तर अध्यक्षस्थानी प्रा.नुतनताई माळवी राहतील.
प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य विद्याताई तट्टे,शुभांगी घाटोळे,यामिनी चौधरी,अ‍ॅड.रेखा बारहाते उपस्थित राहतील तर महिला समिती प्रमुख सुषमा भड संचालन करतील व अरुणा भोंडे या आभार मानतील.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एम्प्लाईज असो.चेन्नर्इे महासचिव जी.करुणानिधी राहणार असून वक्ते म्हणून बहुजन संघर्षचे संपादक नागेश चौधरी,राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे संयोजक नितीन चौधरी मार्गदर्शन करतील.अतिथी म्हणून राज्याचे पशुसंवर्धन ,दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री ना.महादेवराव जानकर,आमदार जितेंद्र आव्हाड,आमदार बच्चू कडू,आमदार विजय रहागंडाले,आमदार बाळू धानोरकर,एस.एल.अक्किसागर,जयतंराव लुटे,प्रा.रमेश पिसे,परिणय फुके उपस्थित राहणार आहेत.संचालन प्रा.रविकांत वरारकर हे तर आभार प्रा.एन.जी.राऊत मानतील.
या महाधिवेशनाच्या यशस्वितेसाठी संङ्मोजक प्रा.बबनराव ताङ्मवाडे, निमंत्रक सचिन राजुरकर, शेषराव येलेकर, शरदराव वानखेडे, खेमेंद्र कटरे,प्रा.एन.जी.राऊत, गुणेश्वर आरीकर, विजयराव तपाटकर, गोपालराव सेलोकर, विनोद उलिपवार, सदानंद माळी, मनोज चव्हाण, सुषमा भड, डी.डी.पटले, निकेश पिणे,बबलू कटरे, पांडुरंग काकडे, शुभांगी घाटोळे, गोविंद वरवाडे, भुषण दळवे, कृष्णा देवासे, श्रावण फरकाडे, अमर वर्हाडे, अ‍ॅड. अशोक येवले, अविनाश काकडे, भैयाजी रडके, अ‍ॅड. विलास कडू, रामलाल गहाणे,कैलास भेलावे, मनोज मेढे, सावन कटरे, विनायक येडेवार, बी.एम. करमकर, संज़ीव रहांगडाले, विष्णू नागरीकर, हरिराम येरणे, शिशिर कटरे, चंद्रकुमार बहेकार, सावन डोये, उमेद्र भेलावे, कृष्णा बहेकार, बालू बडवाईक, उद्धव मेहेंदळे, जितेश राणे, प्रा.राजेंद्र पटले, विवेक मेढे, आनंदराव कृपाण, संतोष वैद्य, आशिष नागपुरे, सविता बेदरकर, प्रदीप निबार्ते, मुरलीधर करंडे, मनोज शरणागत, राजेश चांदेवार,कृष्णा बहेकार,ओम पटले,धन्नालाल नागरीकर,दुर्गाताई तिराले,माधव फुंडे,भोजराम फुंडे,यांच्यासह विदर्भातील सर्व ओबीसी संघटना,जात संघटनांचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

आठ केंद्रांवर ३१ ऑगस्टपर्यंत मतदारनोंदणी-मुख्याधिकारी पाटील

0

गोंदिया,दि.20 : अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदार म्हणून सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे. १ जानेवारी २0१६ पूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेले युवक-युवती मतदार म्हणून आपल्या नावांची नोंदणी करू शकतील. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी केले.ते नगर परिषदेच्या सभागृहात मंगळवारी (दि.१९) आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते.यावेळी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल तसेच प्रशासन अधिकारी सी.ए.राणे,श्री मिश्रा उपस्थित होते.
पाटील यांनी सांगितले, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरून मतदार नोंदणी अभियान राबविले जात आहे. त्यासाठी शहरात ८ ठिकाणी नोंदणी केंद्र देण्यात आले आहेत. निवडणुकीच्या अधिक माहितीसाठी नगर परिषदेने एक व्हॉट्सअँप ग्रुपही तयार केला आहे. नगराध्यक्ष जायस्वाल यांनी यंदा प्रभाग रचना सतर्कतेने तयार केली आहे.प्रभाग रचनेवर ३५ आक्षेप आले असली तरिही त्यात आक्षेप कमी असून नागरिकांनी सल्ला व आपल्या अपेक्षा जास्त नोंदविल्या आहेत. मात्र प्रत्येक आक्षेपावर सुनावणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी नगर परिषद लिपीक मुकेश मिश्रा यांनी मतदार नाव नोंदणी कार्यक्रमांतर्गत तीन प्रकारचे अर्ज वापरले जात असल्याची माहिती दिली. यात अर्ज क्रमांक ६ नाव नोंदणीसाठी, अर्ज क्रमांक ७ नाव वगळण्यासाठी तर अर्ज क्रमांक ८ दुरूस्तीसाठी वापरला जात असल्याचे सांगितले.

निवडणुकीसाठी ५५ लाखांची र्मयादा
येणार्‍या निवडणुकीसाठीच्या कामावर राज्य निवडणूक आयोगाने ५५ लाख रूपये खर्च करण्याची र्मयादा दिली आहे. हा खर्च नगर परिषदेच्या निधीतूनच करायचा आहे. मात्र काही अडचण आल्यास निधीची मागणी करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज करणार असल्याचेही मुख्याधिकारी पाटील म्हणाले. शिवाय येत्या २५ तारखेला सकाळी ११.३0 वाजता येथील म्युनिसिपल शाळेत उपविभागीय अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेत ओळखपत्र वितरणाचा कार्यक्रम आयोजीत केल्याचे सांगितले.

आठ केंद्रात नोडल अधिकारी नियुक्त
मतदार नाव नोंदणीसाठी शहरात आठ केंद्र सुरू करण्यात आले आहेत. यात रेलटोली प्राथमिक शाळेतील केंद्रात रामदास कुराहे, मरारटोली प्राथमिक शाळेतील केंद्रात डी.पी.मेंढे, गणेशनगर प्राथमिक शाळेत विनोद मेश्राम, मालवीय प्राथमिक शाळेत ओ.पी.गुप्ता, एस.एस.गर्ल्स कॉलेजमध्ये अमोल सातपुते, धोटे बंधू महाविद्यालयात डॉ.जी.पी.गाडेकर, महावीर मारवाडी कनिष्ठ महाविद्यालयात जे.व्ही.बिसेन तर पी.पी.शिक्षण महाविद्यालयात कार्तिक दास हे नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

‘सैराट’ सारख्या चित्रपटांमुळे बलात्काराच्या प्रमाणात वाढ – भाजप आमदार

0

मुंबई, दि. १९ : ‘सैराट’सारख्या चित्रपटांमुळे मुले बिघडत असून बलात्काराच्या घटनात वाढ होत असल्याचे अजब तर्कट भाजप आमदार मनिषा चौधरी यांनी मांडलं आहे. कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमिवर मनिषा चौधरी यांनी असे विवादास्पद विधान केले आहे. एवढेच नाहीतर, ‘सैराट’ सारख्या चित्रपटांवर बंदी आणावी, अशी मागणीही त्यांनी केली.
मनिषा चौधरी यांनी हे वक्तव्य विधानसभा कोपर्डी बलात्कार प्रकरणाची चर्चा असतानाच केले आहे. कोपर्डीतील आरोपींना कडक शिक्षेची तजवीज करण्याऐवजी मनिषा चौधरींनी अजब विधान केले आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना सौदी अरेबियात ज्याप्रमाणे शिक्षा दिली जाते, तशीच द्यावी.
त्यामुळे महिला-मुलींवर बलात्कार झाला की तातडीने नराधमाचे हात तोडले पाहिजेत, असंही मनिषा चौधरी म्हणाल्या. बलात्कारानंतर खटला चालेल, दोषीला शिक्षा होईल, ही प्रक्रिया मोठी आहे.

मुशर्रफ यांची संपत्ती गोठवली

0

इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांची सर्व बॅंक खाती आणि इतर संपत्ती गोठविण्याचे आदेश येथील विशेष न्यायालयाने दिले आहेत.

मुशर्रफ यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला सुरू आहे. याप्रकरणी मुशर्रफ यांना हजर राहण्याबाबत अनेकदा नोटीस बजावूनही त्याचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. मुशर्रफ यांनी शरणागती पत्करेपर्यंत अथवा त्यांना अटक होईपर्यंत या प्रकरणाची सुनावणी स्थगित करत असल्याचेही न्यायालयाने सांगितले.

ब्रम्हपुरीत शिकणार्या 17 वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या

0

ब्रम्हपुरी(चंद्रपूर)दि.19- राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्‍कार हत्‍या प्रकरणावरुन राज्‍यात संतापाची लाट उसळली असतानाच चंद्रपूर जिल्‍ह्यातील शंकरपूर जवळ असलेल्‍या लावारीच्या जंगलात झाडाला एका अल्पवयीन मुलीचे मृतदेह आढळल्याची घटना आज मंगळवारी उघडकीस आली.या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भिसी पोलिस स्टेशन अंतर्गत हा लावारीचा जंगल परिसर येत असून सदर मुलगी ही ब्रम्हपुरी येथील महाविद्यालयात 11 वी च्या वर्गात शिक्षण घेत होती.लवारी येथील रहिवासी असलेली ही मुलगी शनिवारी शिरपूर येथील मैत्रिणीला भेटून गावाकडे निघाली होती.दरम्यान रस्त्यात अज्ञात आरोपींनी तिच्यावर बलात्कार केल्यानंतर खून करून तिचे मृतदेह शव झाडाला टांगून ठेवल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद भिसी पोलिसांनी केली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आंबेडकर भवन पाडल्‍याचा निषेध, मुंबईत हजारो भिमसैनिक

0

मुंबई- दादर येथील डॉ. आंबेडकर भवन बेकायदेशीररित्या जमीनदोस्त केल्याबद्दल ट्रस्टच्या सहा विश्‍वस्ताविरूध्द गुन्हा दाखल होवूनही कायदेशीर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ विधान- भवनावर महामोर्चा निघाला आहे. हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले असून, शासनाविरोधात रोष व्‍यक्‍त केला जात आहे. मुंबईत पाऊस सुरू असून पावसात छत्र्या घेऊन आंदोलक मोर्चात सहभागी झालेे आहेत.
राज्‍यातील विविध जिल्‍ह्यातील भिमसैनिक या मोर्चासाठी मुंबईमध्‍ये दाखल झाले आहेत. भवन पाडणा-यांना तत्‍काळ अटक करा अशी मागणी लोक करत आहेत. औरंगाबाद, नाशिक, नागपूर, नगरसह राज्‍यभरातून लोक या मोर्चासाठी मुंबईत दाखल झालेत. पुुण्‍यातून महामोर्चासाठी पाच हजार भिमसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहेत, अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष रामहरी ओव्हाळ व सम्यक विद्यार्थी आंदोलन पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संघटक नवनीत अहिरे यांनी दिली आहे. विविध दलित संघटना या मोर्चात सहभागी झाल्‍या आहेत.
आंबेडकरी चळवळीचा केंद्रबिंदू व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ऐतिहासिक वास्तूमधून 1947 साली बुद्धभूषण प्रिटिंग प्रेस सुरू केली त्या दादरमधील डॉ. आंबेडकर भवनावर 24 जूनच्‍या मध्यरात्री बुलडोझर फिरवण्यात आला. दोन बुलडोझर आणि पाचशे ते सहाशे सुरक्षारक्षकांचे बळ वापरून ही कारवाई करण्यात आली. या घटनेच्‍या सुत्रधारांना अटक करा अशी मागणी महामोर्चातून होत आहे.

आंबेडकर भवन प्रकरणात मुख्‍यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्‍यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई होण्‍याची शक्‍यता आहे. संबंधित अधिकाऱ्यांची तत्काळ चौकशी करून कारवाई करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.