केटीएस व बीजीडब्लूचे रुग्ण अंधारात

0
8

गोंदिया,दि.8- शहरात गेल्या दोन तासापासून सुरु असलेल्या जोरदार पावसामूळे बाजारभागासह शहरातील बहुतांश भागाचा विद्युत पुरवठा खंडीत झालेला आहे.या खंडीत वीज पुरवठ्याचा फटका येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय व बीजीडब्लू महिला रुग्णालयाला सुध्दा बसला आहे.या दोन्ही रुग्णालयात जनरेटरची व्यवस्था असतानाही विजपुरवठा खंडीत होऊनही सुरु न करण्यात आल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अंधारातच आपल्या रुग्णकक्षात ताटकळत बसून राहावे लागत असल्याचे चित्र बघावयास मिळाले.विशेष म्हणजे यासंदभार्त कुठलीही व्यवस्था करण्यासाठी केटीएस मध्ये वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याचे साामाजिक कार्यकर्ते कुशल अग्रवाल यांनी बेरार टाईम्सला सांगितले.तर बीजीडब्लू रुग्णालयातही तीच परिस्थिती असून तिथे सुध्दा जनरटेर सुरु न करण्यात आल्याने वैद्यकिय अधिकारी डाॅ.संजीव दोडके यांना जनरेटर सुरु करण्यासंदभार्त विचारणा करण्यात आल्याची माहिती दिली आहे.सद्या पावसाळाचे दिवस असून कधीही विजेचा लपंडाव सुरु असतो त्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांनी याकडे विशेष लक्ष पुरवून या दोन्ही रुग्णालयात सतत विज पुरवठा कसा सुरु राहील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.