नागपूरात रेशीमबागेत कॉंग्रेसचा जल्लोष

0
8
नागपूर दि. ८:– बिहारमधील महाआघाडीच्या विजयाचा जल्लोष नागपुरातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रेशीमबाग येथे फटाके वाजवून साजरा केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार व गोळवलकर स्मारक परिसराच्या जवळ हा जल्लोष झाल्याने शहरात विशेष चर्चा होती.
आज घोषित झालेल्या निकालानंतर लोकांची शाळा चौकातून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली. फटाके फोडून महाआघाडीच्या विजयाचा आनंद साजरा केला. लोकांची शाळा चौकातून केशवद्वारमार्गे रेशीमबागेतील संघाच्या स्मारक परिसराजवळ या घोषणा देण्यात आल्या.