विषयाचे मर्म दाखविण्याचे कार्य व्यंगचित्र करते – वामनराव तुरिले

0
11

भंडारा दि. १६: व्यंगचित्र हे विषयाचा मर्म दाखविण्याचे महत्त्वाचे कार्य करते. त्याचित्रातून घटनेची अभिव्यक्ती स्पष्ट होते. सामान्य मानसाला सुध्दा या व्यंगचित्रातून विषयाचा सरळ सोपा अर्थ कळणे शक्य होते, असे मत ज्येष्ठ पत्रकार वामनराव तुरिले यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय पत्रकार दिनाचा कार्यक्रम जिल्हा माहिती कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून व्यंगचित्र व अर्कचित्र कलेचे महत्त्व आणि प्रभाव या विषयावर माहिती देताना श्री. तुरिले बोलत होते. 
यावेळी ज्येष्ठ पत्रकार वामनराव तुरिले यांनी वयाचे पंच्याहत्तर वर्षात पर्दापणानिमित्त कार्यालयातर्फे शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे, उन्नीकृष्णन, मनोहर सप्रे आदी व्यंगचित्रकारांविषयी चर्चा करण्यात आली. समस्येला वाचा फोडण्याचे मोठे सामर्थ्य व्यंगचित्रात असते. यावेळी गोपू पिंपळापूरे, विजय खंडेरा यांची समयोचित भाषणे झालीत. 

कार्यक्रमाला दीपक फुलबांधे, नरेश बोपचे, इंद्रपाल कटकवार, दीपक रोहणकर, राजु मस्के, अनिल आकरे, दीपेंद्र गोस्वामी, देवानंद नंदेश्वर, रवी खोब्रागडे, समीर नवाज, विलास केजरकर, सुरेश फुलसुंगे आदी पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे यांनी केले.