तुमसर व मोहाडी तालुक्यातील रोहयोतील मजुरांची मजुरी अदा करणार- पंकजा मुंडे

0
9
नागपूर,दि,21-येथील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात पहिल्या दिवशी तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी विचारलेल्या रोहयो मजुरीच्या प्रश्नावर ग्रामविकास मंत्र्यानी मजुरी देण्याचे आश्वासन दिले.तुमसर व मोहाडी (जि. भंडारा) तालुक्यातील रोजगार हमी योजनेंतर्गत असणाऱ्या मजुरांची मजुरी देण्यास तांत्रिक कारणांमुळे विलंब होत आहे. या तांत्रिक बाबींची पूर्तता करुन मजुरांची मजुरी अदा करण्यात येईल, असे रोजगार हमी योजना मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य चरण वाघमारे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना श्रीमती मुंडे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, तुमसर व मोहाडी तालुक्यातील रोजगार हमी योजनेंतर्गत असणाऱ्या मजुरांची मजुरी देण्यास आधार कार्ड व बँकेतील तपशील अपूर्ण असल्याने विलंब झाला. या तांत्रिक अडचणी दूर करुन यात सुसूत्रता आणण्यात येईल. तसेच नवीन तंत्रज्ञान विकसित करुन याचे सुलभीकरण करण्यात येईल. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री विजय वड्डेटीवार, बच्चू कडू आदींनी सहभाग घेतला.