लैंगिक अत्याचार प्रकरणी मेडिकल प्रोटोकॉलचे पालन होत नाही- निलम गो-हे

0
12

नागपूर,दि,21-” निर्भया केस मधील अल्पवयीन गुन्हेगाराला जीवनदान मिळाले आहे. त्याची शिक्षा वाढावी व त्याला इतक्या लवकर सोडू नये यासाठी सुप्रीम कोर्टात केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. मात्र, अल्पवयीन असून ज्याप्रकारे त्याने भीषण गुन्हा केला ते पाहून त्याला दीर्घकाळ शिक्षा होणे आवश्यक आहे.” असे मत शिवसेना आमदार निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. निर्भया हत्याकांडातील बालन्हेगाराची काल सुटका झाली. याविषयी विधानभवन परिसरात पत्रकारांशी त्या बोलत होत्या.  ‘सुधारगृहातील त्याचे वास्तव्य वाढवता येणार नाही’ असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिल्याने त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता. या गुन्हेगाराची सुटका करू नये अशी याचिका भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सुप्रीम कोर्टात केली होती.

राज्यसभेत जुवेनाईल जस्टीस अक्ट अजूनही प्रलंबित आहे यासंबंधी खासदार अनिल देसाई व खासदार संजय राऊत यांच्याशी चर्चा झाली असून हे विधेयक लवकरात लवकर मंजूर व्हावे म्हणून शिवसेना प्रयत्न करेल. अशी माहिती गोऱ्हे यांनी यावेळी दिली.मेडिकल प्रोटोकॉलची अंमलबजावणी होताना दिसत नाही. मेयो हॉस्पिटल वगळता इतर कुठेही मेडिकल प्रोटोकॉलची अंमलबजावणी होत नाही. याविषयी त्यांनी खंत व्यक्त केली. याविषयी गृहराज्यमंत्री राम शिंदे आणि सामाजिक न्याय मंत्री बडोले यांची लवकरच भेट घेणार असल्याचे त्या म्हणाल्या.