बुलडाणा -27 प्रवाशांना घेऊन बस उलटली

0
5
बुलडाणा – ट्रॅव्‍हल्‍स चालकाला झोप लागल्‍याने मेहकर क्रीडा संकुल समोर पहाटे अपघात झाला या अपघातात 13 प्रवाशी जखमी झाल्‍याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. विदर्भ ट्रॅव्हलची लग्झरी बस पुणे येथून यवतमाळकडे जात असताना हा अपघात झाला आहे.सुदैवाने प्राणहानी नाही. ट्रॅव्‍हल्‍स उलटून झालेल्‍या अपघातात 13 प्रवाशी जखमी झाले. 10 प्रवाशांना उपचारासाठी मेहकर येथे दाखल करण्‍यात आले आहे. 3 प्रवाशांना मल्टी स्पेशॅलिटी हॉस्‍पिटलमध्‍ये उपचार घेत आहेत.अपघात झाल्‍यानंतर परिसरातील नागरिकांनी मदतकार्य केले.यवतमाळ येथील विदर्भ ट्रॅव्‍हल्‍सची खाजगी बस पूणे येथून यवतमाळकडे 27 प्रवाशी घेऊन जात होती. दरम्‍यान पहाटे 5 च्‍या सुमारास चालकाला झोप लागल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रोडच्या बाजूला उलटली.