बाबासाहेबांचे विचार आत्मसात करा- ना. बडोले

0
16

सडक अर्जुनी,दि.२६ : भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांततेचा माध्यमातून नागरिकांना हक्क व कर्तव्याची जाणीव करून दिली. तर शिक्षण हे प्रगतीचे व्दार असल्याने शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, बाबसाहेबांच्या या विचारामुळे आपण उच्चस्थ पदावर पोहचलो. त्यामुळे बाबासाहेबांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करावा, असे मत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
ते लॉर्ड बुद्धा मैत्री संघ सडक अर्जुनीच्या वतीने सौंदड येथे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या विधायक जयंती महोत्सव, भारतीय राज्य घटनेचा ६५ वा ‘संविधान दिनङ्क, कर्मयोगी संत गाडगेबाबा स्मृती दिन व लॉर्ड बुद्धा टी. व्ही. मैत्री संघ सदस्यता अभियान निमित्ताने आयोजित परिसंवाद व अनिरूद्ध वनकर यांचा ‘मी वादळ वारा……आंबेडकरी जलसा, बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लॉर्ड बुद्धा टी.व्ही.चे संचालक भैय्याजी खैरकर होते. याप्रसंगी परिसंवाद प्रवक्ते नागपूरचे सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. भाउ लोखंडे, बहुजन संघर्ष पाक्षीकाचे संपादक नागेश चौधरी, आंबेडकर विचारवंत व लेखक के. ना. सुखदेवे, नागपूरचे मनोहर मेश्राम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. सदस्य रमेश चुèहे, पं. स. सभापती कवता रंगारी, पं. स. सदस्या गायत्री झटे, सडक अर्जुनीच्या नगराध्यक्षा रीता लांजेवार, माजी जि. प. सदस्य रूपाली टेंभुर्णे, माजी पं. स. चे उपसभापती दामोदर नेवारे, लोहिया शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जगदीश लोहिया, रतन वासनिक आदी उपस्थित होते.
परिसंवादामध्ये प्रवक्ते डॉ. भानु लोखंडे, नागेश चौधरी, के. ना. सुखदेवे, मनोहर मेश्राम यांनी, भारतीय संविधान आंबेडकरी क्रांतीची दशा व दिशा, सामाजिक परिवर्तन व भारतीय संविधान, डॉ. आंबेडकर व संत गाडगेबाबा यांचे जीवन कार्य आदी विषयांवर आपले विचार व्यक्त केले. भैय्याजी खैरकर यांनी अध्यक्षीय भाषणातून बौद्ध धम्म व डॉ. बाबासाहेब याविषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक धनरूप उके यांनी केले. संचालन अनिल मेश्राम व राजकुमार भगत यांनी तर आभार ए. पी. मेश्राम यांनी मानले.