पाच वर्षांत नक्षलग्रस्त भागाचा चेहरा बदलणार-आ.पुराम

0
16

देवरी,दि. २6 : देवरी, सालेकसा तालुक्यांवर नेहमीच शासनाने अन्याय केला. त्यामुळे आजही या भागातील नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधा  मिळाल्या नाहीत. त्या सुविधा पुरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. त्याकरिता गेल्या वर्षभरात मंत्री, सचिव आणि त्या-त्या विभागातील अधिकाèयांशी चर्चा केली. येणारी चार वर्षे आता प्रत्यक्ष कृती करण्याकरिता खर्ची घालणार आहे. नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम अशी ओळख असलेल्या दोन्ही तालुक्यांसह आमगाव तालुक्याचा देखील विकास करण्यावर भर असणार आहे. या चार वर्षांत आमगाव-देवरी विधानसभा मतदार संघाचा चेहरामोहरा बदलणार असल्याचा आशावाद आमदार संजय पुराम यांनी व्यक्त केला.
आमदार संजय पुराम म्हणाले, नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात क्षेत्रातील प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासंदर्भात मंत्री आणि सचिवांशी चर्चा झाली. त्यात आदिवासी मुलीकरीता वस्तीगृहे आहेत. परंतु, ओबीसी, एससी आणि एनटी प्रवर्गातील मुलींकरिता वस्तीगृहे नाहीत. त्यामुळे आमगाव, सालेकसा आणि देवरी येथे वस्तीगृह तयार करण्याची मागणी सामाजिक न्याय विभागाकडे केली. मंत्री राजकुमार बडोले यांनी देवरी येथे वस्तीगृहाला मंजूरी दिली. कचारगड, हाजराङ्काल आणि ढासगडच्या विकासाकरिता मुख्यवन संरक्षक श्री भगवान यांच्याशी चर्चा केली. त्यांनी या क्षेत्रांचा विकास करून पर्यटन विकसित करण्याचे आश्वासन दिले. तिन्ही तालुक्यांत मोठ्या प्रमाणात मोहफुलाची झाडे आहेत. त्यातून दोन लाख qक्वटल मोहफुल वर्षाला गोळा होतो. मात्र, शेतकèयाला फक्त पाच किलो मोहफुल ठेवण्याची बंदी आहे. ती बंदी उठवून प्रक्रीया उद्योग सुरू करण्याची मागणी केली. मागणीला यश आले असून लवकरच प्रक्रिया उद्योग सुरू होणार आहे. आदिवासींचे हक्क हिरावणारे २१ ऑक्टोबर २०१५ चे शासन परिपत्रक रद्द करण्याकरिता मोर्चा काढला. स्वतःच्या शासनविरोधात उगारलेला हा एल्गार होता. मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ लक्ष घालून आदिवासी सल्लागार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.  क्षेत्राचा कायापालट करणे हाच मुख्य उद्देश असून त्यादृष्टीने काम सुरू केल्याची माहिती आमदार संजय पुराम यांनी दिली.