मुख्यमंत्र्यानी एैकल्या नागरिकांच्या समस्या

0
9

नागपूर, दि. 26 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हैद्राबाद हाऊस येथे 1500 सामान्य नागरिकांची गाऱ्हाणी ऐकली तसेच निवेदने स्वीकारलीत. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार विकास कुंभारे, महापौर प्रविण दटके, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नासुप्रचे मुख्य अभियंता सुनील गुज्जेलवार, विशेष कार्य अधिकारी श्रीमती आशा पठाण, उपजिल्हाधिकार निशिकांत सुके हे होते.

आज निवेदने देणाऱ्यांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा प्रिंपी येथील शहीदस्मारक, दिग्रस येथील नागरिक, मेहतर समाज, सुशिक्षित बेरोजगार, प्रकल्पग्रस्त, सोनी समाज मित्र मंडळ, माजी सैनिक, गोसेखुर्द, मिहान प्रकल्पग्रस्त या व इतर संस्था, संघटनांचे प्रतिनिधीनी व नगरसेविका चेतना टांक, मुन्ना महाजन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या.
सोनी समाज मित्र मंडळाच्या शिष्टमंडळाने संत नरहरी महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यावेळी केली. मनोरुग्णालय परिसरातील जमीन भाडे पट्टीवर देण्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. सुशिक्षित बेरोजगारांची एका कंपनीने फसवणूक केल्या प्रकरणी कार्यवाही करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली. धरमपेठ येथील अवैध अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. माजी सैनिकांनी मालमत्ता करात सूट मिळण्याबाबत निवेदन दिले.