ओबीसींच्या प्रश्नांना घेऊन ध़डकला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0
8

गडचिरोली,  दि.१8:ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी संघर्ष कृती समितीने आज पुकारलेल्या जिल्हाबंद आंदोलनाला चांगलाच प्रतिसाद मिळाला.तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चामध्ये जिल्ह्यातील मोठ्या संख्येने ओबीसी बांधवानी सहभागी होऊन शासनाच्या ओबीसी विरोधी भूमिकेचा जाहिर निषेध नोंदविला.ओबीसींचा मोर्चा बघून पोलीसांनाही घाम फुटलेला होता.या मोर्चामध्ये काँग्रेसचे विधानसभेचे उपगटनेते आमदार  विजय वड्डेट्टीवार यांनीही सहभाग नोंदविला.सोबतच भाजपचे आमदार कृष्णा गजबे सुध्दा या मोर्च्यात सहभागी झाले.परंतु भाजप सरकारविरुध्दचा ओबीसीमध्ये असलेल्या रोषामुळे जनतेने गजबे यांना भाषणच देऊ दिले नाही,उलट आपल्या सरकारला ओबीसींच्या समस्या त्वरीत सोडवायला सांगा अशा घोषणा दिल्या.

 ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यांवरुन ६ टक्के करण्यात आल्याने हा समाज आधीच अडचणीत आला आहे. त्यानंतर राज्यपालांनी काढलेल्या अधिसूचनेमुळे ओबीसी उमेदवार नोकरभरतीतून बाद झाले असून, त्यांच्यावर बेरोजगार होण्याची पाळी आली आहे. आरक्षण पूर्व्रवत करावे व अधिसूचनेत सुधारणा करावी, या प्रमुख मागण्यांसह अन्य २४ मागण्यांसाठी ओबीसी संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्च्यामध्ये  अऱुण पाटील मुनघाटे,प्रा.शेषराव येलेकर,दादाजी चापले,बाबुराव कोहळे,रमेश चौधरी,बाबुराव बावणे,सुरेश मांडगवगडे,दादाजी चुधरी,वामन राऊत,भाष्कर भुरे,महेंद्र ब्राम्हणवाडे,रविंद्र वासेकर,गुरुदेव भोपये,नंदु नाकतोडे,राजेश कात्रटवार,रमेश मडावी,पांडुरंग घोटेकर, पंकज खरवडे, भारत बावनथडे, नंदू नाकतोडे , राजू मोहुर्ले, महादेव गणोरकर, नाना पाल, रोहन ठाकरे आदीं सहभागी झाले होते