गाव आदर्श करणे नागरिकांची जबाबदारी-आ.रहांगडाले

0
9

तिरोडा दि.२५: समाधान योजनेंतर्गत शिबिरामध्ये शासनाच्या प्रत्येक विभागाचा अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती असल्याने एखाद्या प्रमाणपत्रासाठी व अन्य समस्यांचे निराकरण तत्काळ पद्धतीने होते. जनता व प्रशासन एकत्रित आल्याने समस्या लवकर मार्गी लागतात. नागरिकांनी आपल्या गावाला आदर्श बनविणे ही प्रत्येकांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले.

महाराजस्व अभियानांतर्गत चिखली येथे आयोजित समाधान योजनेच्या शिबिरात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आपल्या गावाच्या रस्त्यावरील कुडे, खतांची ढिगारे स्वत:हून हटविणे आवश्यक आहे. सर्व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.
शिबिराचे आयोजनाबाबत आयोजक अधिकारी, तहसीलदार यांनी या कार्यक्रमाचे प्रचार व प्रसिद्धीबाबत कमी पडले असल्याने शेतकर्‍यांची उपस्थिती कमी आहे.प्रचार व प्रसिद्धी जास्त केली असती तर शेतकर्‍यांची उपस्थिती जास्त राहली असती जेणेकरून शासकीय योजनांची अंमलबजावणी चांगली झाली असती. यापुढे प्रचार व प्रसिद्धीकडे संबंधित अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे असेही सांगितले.
यावेळी कृषी, पशुसंवर्धन, शिक्षण, विद्युत विभागाच्या वतीने स्टॉल लावण्यात आले असून त्यांची माहिती संबंधितांनी शेतकर्‍यांना द्यावी. रेतीघाटाचा लीलाव रखडण्याची कारणे व उपाय सांगून २९ ला लिलाव होऊन संबंधित समस्या मार्गी लागणार आहे. शेतकर्‍यांनी प्रत्येक वर्षी सातबारा काढून आपल्या शेतीची कागदपत्रे तपासून पहावे. तहसीलदारांनी आपल्या अधिकारी, कर्मचार्‍यांना सांगावे की सातबारा शेतकर्‍यांना मोफत द्यावा.
महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान योजनेचे शिबिर मंडळ ठाणेगाव अंतर्गत चिखली येथे घेण्यात आले. या कार्यक्रमाचे उद््घाटन आ. विजय रहांगडाले यांचे हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी तहसीलदार रवींद्र चव्हाण, अतिथी म्हणून सरपंच कैलास पटले, खंविकास अधिकारी एच.एस. मानकर, जि.प. सदस्या प्रिती रामटेके, पंचायत समितीचे सदस्य प्रदीप मेश्राम, पत्रकार संघाचे अध्यक्ष डी.आर. गिरीपुंजे, माजी पं.स.सदस्य थानसिंग रहांगडाले, शिवाजी क्षीरसागर, सु.द. रहांगडाले, वोकाजी पटले, तेजराम पटले, मंगरू पटले यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी विविध विभागाच्या वतीने स्टॉल लावून शेतकर्‍यांना माहिती देण्यात आली.या योजनेंतर्गत तत्काळ अधिवास प्रमाणपत्र तयार करुन आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते रितू क्षीरसागर, आचल क्षीरसागर, डिंपल रंगारी, साक्षी रंगारी, रोषणी पटले, अरविंद रहाटे यांना वितरीत करण्यात आले.
कृषी विभागाने स्टाल लावून कोणकोणत्या भाजीपाला शेतकर्‍यांनी कशाप्रकारचे लावावा तसेच अन्य पिकाची माहिती देण्यात आली. प्रत्येक विभागाच्या वतीने कर्मचारी उत्स्फूर्त प्रतिसाद देत होते.
संचालन ग्रामसेवक गिरीश भेलावे, प्रास्ताविक नायब तहसीलदार विलास कोकवार, आभार मंगरू पटले यांनी मानले.