ओबीसी संघर्ष कृती समितीचे बुधवारला बैठक

0
14

गोंदिया-केंद्र व राज्यसरकारच्यावतीने ओबीसी समाजाच्या जनगणनेला करण्यात येत असलेला विरोध आणि ओबीसी आरक्षणात करण्यात येत असलेल्या कपातीच्या मुद्यासह गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या ओबीसी शिष्यवृत्तीच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी येत्या बुधवारला मयूर लॉन येथे सायंकाळी ५ वाजता ओबीसी संघर्ष कृती समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीमध्ये गोंदिया जिल्ह्यातील ओबीसी समाजातंर्गत येत असलेल्या सर्व जातीय संघटनाच्या जिल्हाप्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे.सोबतच खासदार नाना पटोले,माजी खासदार प्रा.महादेवराव शिवणकर,केशवराव पारधी,डॉ.खुशालचंद्र बोपचे,शिशुपाल पटले,आमदार विजय रहागंडाले,माजी आमदार हेमंत पटले,केशवराव मानकर,रमेशभाऊ कुथे,भैरqसह नागपूरे,दयाराम कापगते,खोमेश्वर रहागंडाले,भरतभाऊ बहेकार,जि.प.अध्यक्ष उषा मेंढे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे,मनसेचे जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार कुथे,मुकेश शिवहरे,नगराध्यक्ष कशिश जायस्वाल,जि.प.अध्यक्ष उषा मेंढे,उपाध्यक्ष रचना गहाणे,माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर यांच्यासह राजकीय पक्षाच्या ओबीसी आघाडीचे अध्यक्ष,जि.प.पदाधिकारी,नगरपंचायतचे ओबीसी नगराध्यक्ष,उपाध्यक्ष व पदाधिकारी,ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते,पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी यांना या बैठकीला आमंत्रित करण्यात आले आहे.