सिध्दार्थ हाय.च्या मुख्याध्यापकासह परिचराला लाच घेतांना अटक

0
13

गोंदिया,दि.१४-तिरोडा तालुक्यातील ठाणेगाव येथील सिध्दार्थ ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक लीलाधर दुलीचंद बागडे व परिचर नंदकुमार सिडामेला आज ८ हजार रुपयाची लाच घेतांना भंडारा लाचलुतपत विभागाच्या पथकाने अटक केली.फिर्यादी हा सिध्दार्थ हायस्कुल ठाणेगाव येथून इयत्ता १२ वीच परिक्षा २०१५-१६ या वर्षात उत्र्तीर्ण झाला होता.पुढील शिक्षणाकरीता शाळा सोडल्याच्या दाखल्याची आवश्यकता असल्याने दाखला मागण्यासाठी केला असता मुख्याध्यापक बागडे यांनी दहा हजार रुपयाची लाच मागीतली.ती लाच देण्याची मूळीच इच्छा नसल्याने फिर्यादीने भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.त्या तक्रारीच्या आधारावर आज सापळा रचून कारवाई करण्यात आली असता मुख्याध्यापक बागडे यांनी तडजोड करीत ८ हजार रुपये मान्य करीत ती रक्कम नंदकुमार सिडामे परिचरामार्फेत स्विकारतांना रंगेहाथ पकडले.याप्रकरणी तिरोडा पोलीस ठाण्यात अप.क्र.१७८य१६ कलम ७.१२.१३(१)(ड) सहकलम१३(२) ला.प्र.कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई प्रभारी पोलीस उपायुक्त राकेश शर्मा यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधिक्षक दिनकर सावरकर,पोलीस निरिक्षक प्रदिप पुल्लरवार यांच्या पथकाने केली.विशेष म्हणजे ठाणेगाव येथील सिध्दार्थ हायस्कुल हे माजी आमदार दिलीप बनसोड यांच्या संस्थेची आहे.