ओबीसीनी लिडरशीपसाठी नव्हे तर समाजासाठी काम करावे- गावंडे

0
11

गोंदिया,दि.30-लोकसंख्येने मोठा असलेला ओबीसी समाज हा जातीजातीमध्ये विखुरलेला आहे.या समाजाला संघटित होणे गरजेचे असून समाजाला संघटित करतांना ओबीसी संघटनातील प्रमुखांनी राजकीय लिडरशिप डोळ्यासमोर न ठेवता राष्ट्रीय स्वयसेवक संघाच्या समाजासाठीच्या कार्याला आधी प्राधान्य नंतर राजकारण या भूमिकेला लक्षात ठेवून समाजासाठी काम करावे असे आवाहन ओबीसी सेवा संघाचे प्रतिनिधी,बळी संदेश साप्ताहिकाचे संपादक बाळासाहेब गावंडे यांनी केले.ते गोंदिया येथील चंचलबेन हायस्कुल येथे आज शनिवारला आयोजित राष्ट्रीय ओबीसी महासंघ,ओबीसी संघर्ष कृती समिती व ओबीसी सेवा संघाच्या मासिक बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे होते.यावेळी ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.बी.एम.करमरकर,ओबीसी संघर्ष कृती समितीचे कार्याध्यक्ष अमर वराडे मंचावर उपस्थित होते.यावेळी बोलतांना गावंडे म्हणाले की,ओबीसी जनगणेचा प्रश्न सर्वात मोठा प्रश्न आहे.जोपर्यंत जनगणना होणार नाही.तोपर्यंत आपल्या समाजाचा विकास शक्य नाही.परंतु मनुवादी सरकार हे होऊ देणार नाही.भाजपचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे यांनी ओबीसी जनगणनेचा मुद्दा रेटून धरला शेवटी त्यांची शिकार करण्यात आली.छगन भुजबळ यांना तुरुंगात पाठविण्यात आले.आता मी ओबीसी बोलतोय पुस्तक लिहिणारे हनुमंत उपरे यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला.याचाच अर्थ जो कुणी ओबीसीना जागृत करण्यासाठी काम करेल त्याचा नायनाट करण्याचे षडयंत्र या देशातील एका मनुवादी संघटनेच्या इशारावर सरकार करते त्यासाठी आपण सर्वांनी संघटित होऊन समाजासाठी काम केले पाहिजे.समाजाला जागृत करण्याचे महत्वाचे काम आहे.समाज जागृत झाला तर आपोआपच तुमच्या लिडरशीपला महत्व येईल परंतु आधीच राजकीय लिडरशीप डोळ्यासमोर कुणी काम करीत असले तर ओबीसी संघटना या अल्पकाळाच्या ठरू शकतात याची खबरदारी घेत आपण समाजाला संघटित करु असे म्हणाले.यावेळी अमर वराडे यांनी गोंदिया जिल्ह्यात तालुकास्तरावर नव्याने संगठन बाधणी झाल्यानंतर जिल्हा कार्यकारीणीचा विस्तार करण्याचे गरज असल्याचे मत माडंले.प्रा.करमकर यांनी 7 आॅगस्टच्या ओबीसी महाधिवेशनात शिक्षित युवकांना नेऊन त्यांना समाजासाठी सोबत झालेल्या अन्यायाची जाण करुन देणे गरजेचे असल्याचे विचार मांडले.बैठकीचे अध्यक्ष बबलू कटरे यांनी ओबीसी संघर्ष कृती समिती समाजासाठीच काम करीत असून आम्हाला कुठलाही राजकीय हेतू समोर ठेवायचा नाही,त्यामुळेच सर्वपक्षीय लोकांना सोबत घेऊन काम करीत आहोत.परंतु भाजपच्याच काही नेत्यांनी आपल्या ओबीसी बांधवाना भ्रमणध्वनी व फोन करुन ओबीसी सघंटनेत सहभागी होऊ नका असा वारंवार देण्यात येत असलेला संदेश आणि त्या संदेशालाच महत्व देऊन आधी ओबीसी नंतर पक्ष ही भूमिका ठामपणे न मांडता मूग गिळून बसणार्याना टिकेचा अधिकार नसल्याचे सुतोवाच केले.तसेच नागपूरच्या अधिवेशनात गोंदिया जिल्ह्यातील 100 ते 150 युवकांना नेण्यात येणार असून त्यांनतर जिल्हा कार्यकारीणीचा विस्तार करण्यात येणर असल्याचे सांगितले.
सोबतच सालेकसा तालुक्यात 28 जुर्ले रोजी घडलेल्या प्रकाराची माहिती देत आर्थिक देवाणघेवाणीतून झालेल्या मारहाणीमध्ये चुकीच्या पधद्तीने अॅट्रासिटीचा वापर करुन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काहींनी केला असला तरी ओबीसी संघटना याप्रकरणात दोन्ही समाजामध्ये कुठलीही दरी निर्माण न होऊ देता चुकीच्या पध्दतीने गुन्हा दााखल करणाया पोलीस अधिकारीबाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.यावेळी प्रास्तविक खेमेंद्र कटरे यांनी केले,तसेच नागपूर अधिवेशनाच्या तयारीची माहिती देत जानेवारी ते जून महिन्यापर्यातंच्या ओबीसी संघर्ष कृती समितीच्या आर्थिक बाबीची माहिती सादर केली.बैठकिला मनोज मेंढे,सावन कटरे,कैलास भेलावे,रुपचंद टोपले,हरिष ब्राम्हणकर,एस.एम.भवसागर,एस.आर.वैद्य,कमलेश कामडी,लक्ष्मण नागपूरे,बि.व्ही.शहारे,कृपाल लांजेवार,राजेश नागरिकर,अनिल फुंडे आदी सदस्य उपस्थित होते.