स्वातंत्र्य दिन कार्यक्रम ;पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते ध्वजारोहण

0
12

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार
गोंदिया,दि.१3 : भारतीय स्वातंत्र्याच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वाजता पोलीस मुख्यालय मैदान कारंजा येथे पालकमंत्री राजकुमार बडोले हे ध्वजारोहण करतील. त्यानंतर ते परेडचे निरीक्षण करुन उपस्थितांना संबोधित करतील. त्यानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हयात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, युवक, युवती, विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
यामध्ये सन २०१४-१५ या वर्षात महसूल विभागात विभागीय स्तरावर उत्कृष्ट कामगीरी केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये तुमसर येथील तत्कालीन नायब तहसिलदार तथा विद्यमान गोंदिया तहसिलदार अरविंद हिंगे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून संजय धार्मिक, तिरोडा तालुक्यातील बेलाटी येथील पोलीस पाटील श्री.रिनाईत, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सन २०१५-१६ मध्ये हागणदारी मुक्त घोषित करण्यात आलेल्या ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये आमगाव तालुक्यातील गोसाईटोला येथील सरपंच प्रभाबाई शिवबंशी, सचिव डी.के.महाकाळकर, सालेकसा तालुक्यातील रोंधा ग्रामपंचायत सरपंच मिलावतीबाई लिल्हारे, सचिव एन.जी.राठोड, बिंझलीच्या सरपंच सुलोचना लिल्हारे, सचिव जी.सी.भुमके, अर्जुनी/मोर. तालुक्यातील तुकमनारायण, ग्रामपंचायतचे सरपंच दयाराम शहारे, सचिव एस.एस.मेंढे, सोमलपुरचे सरपंच आशा हातझाडे, सचिव वाय.सी.डोंगरे, तिरोडा तालुक्यातील सालेबर्डीचे सरपंच विनोद लिल्हारे, सचिव गणेश कापगते, मनोरा ग्रामपंचायतच्या सरपंच लताबाई पेशने, सचिव एस.डी.उईके यांचा तर क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत जिल्ह्यातील युवकांनी समाजहितासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून जिल्हास्तरीय युवा पुरस्कार ब्रम्हानंद सांस्कृतिक अकादमी गोंदिया, कपील बिसेन, सीमा रहांगडाले यांना देण्यात येणार आहे.
माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत आमगाव तालुक्यातील पदमपूर येथील हर्षा भेदे, गोरेगाव तालुक्यातील हिरापूर येथील स्वरांगी नेवाने यांना प्रशस्तीपत्र, आरोग्य विभागात सन २०१५-१६ या वर्षात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.सी.वानखेडे यांनी सर्वाधिक कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्याबद्दल, प्राथमिक आरोग्य केंद्र खमारीच्या आरोग्य सेविका कुसूम लांजेवार, कुंदा गजभिये, आशा कार्यकर्ती म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगावच्या रेखा पटले. गोंदिया भारत स्काऊट आणि गाईडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सुवर्णा बाण चाचणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुरुकृपा आदिवासी आश्रम शाळा ठाणा येथील कब मुले शिवांक उईक, अविनाश मडावी, हिरालाल वरखडे, गुरुनानक वरिष्ठ प्राथमिक शाळा गोंदियाच्या बुलबुल मुली अश्वीनी नंदागवळी, सांची रंगारी, राज्यस्तरीय उत्कृष्ट स्काऊटर पुरस्कार जीईएस हायस्कूल दासगावचे भगीरथ जिवानी, गुरुनानक वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या मंजुषा देशपांडे, सामाजिक वनीकरण विभागामार्फत राष्ट्रीय हरित सेना योजनेअंतर्गत निवड केलेल्या २ कोटी वृक्ष लागवड आणि त्याचे होणारे चांगले परिणाम या विषयावरील निबंध स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या प्राथमिक गटातील जानवी वैद्य- प्रथम, करिश्मा कारडा- द्वितीय, हर्षल डोंगरे- तृतीय. माध्यमिक गटातील गीतांजली पोहरे- प्रथम, हेमाश्री तुरकर- द्वितीय, कुशल बिसेन- तृतीय यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.