बसचालकाला मारहाण रामटेक डेपोचा चक्काजाम

0
14

नागपुर,दि.13-रामटेक डेपोतून मौदा-रामटेक मार्गावर चालणार्या एका बसच्या चालक वाहकाला मारण्यात आल्याचा मुद्दा पुढे करीत रामटेक डेपोतील चालक वाहकांनी चक्का जाम आंदोलन करीत जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत एसटीची चाके चालणार नाही अशी भूमिका घेतल्याने तणावाचे वातावरण तयार झाले होते.या आंदोलनाचे परिणाम इतर डेपोतही पोचल्याने नागपूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चालकांनी ST ची चाके थांबविल्याने प्रवाशाना त्रास सहन करावा लागला होता.सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मौदा तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात रामटेक नागपुर आणि रामटेक कडून मौदा येथे शाळा कॉलेज चे विद्यार्थी येणे जाणे करतात मात्र काही हेखेखोर चालकांचा मनमानी मुळे आणि बसथाब्यावर बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याकारणाने आज शिवसेनेच्या देवेन्द्र गोडबोले यांचा नेतृवात मौदा तालुक्यातील कुंभारी परीसरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले.या आंदोलनादरम्यान चालक वाहकाला मारहाण झाल्याचा आरोप करीत रामटेक डेपो च्या चालक वाहकानी आरोपींवर कार्यवाहिच्या मागणी करिता st ची चाके थांबविलि होती.