दोन दिवसात अतिक्रमण झालेली भिंत तोडण्याचे आदेश

0
9

.अन जिल्हाधिकारी पोहोचले बांधतळ्यावर

berartimes.com,
 गोंदिया:- शहरातील सुर्याटोला परीसरातील जवळ असलेल्या बांधतलाव मागील चार ते पाच दिवसापासून येत असलेल्या पावसामुळे बांधतलाव ओव्हरफलो झाले आहे. व या ओव्हरफलोचे पाणी निघण्यासाठी शेत शिवा-याजवळील नाला जे कुडव्या कडून वाहतो. मात्र त्या नाल्यावर अतिक्रमण करून भिंत बांधण्यात आली आहे. त्यामुळे बांधतलावाचे पाणी जाण्यासाठी मार्ग मिळत नसल्याने पाणी हा सुर्याटोला परीसरातून होउन रामनगर रस्त्यांवर पाणी वाहत आहे. त्यामूळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलेले आहे. व रस्त्यावरही तीन ते चार फुट पाणी वाहत आहे. या रस्त्यावरून लोकांना येणे-जाणे कठीण झाले आहे. तसेच लहान मुलांना शाळेत ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तसे ज्याच्या घरात पाणी शिरले आहे. असे लोक संपूर्ण दिवस घरातील पाणी घराबाहेर काढण्यासाठी व्यस्त झाले आहे. त्यामूळे त्यांना कामावर जाणे कठीण झाले आहे. गेल्या दोन दिवसापासून घरांत शिरलेले पाणी काढण्यात व्यसत असल्याने त्शंचा रोजगार हिरावले आहे. हिच स्थिती बांधतलावर असलेल्या अतिक्रमाणामूळेच उद्भवल्याची माहिती परीसरातील नागरिकांनी जिल्हाधिका-यांना सांगितली.
अतिक्रमण धारकांना दिले नोटिस- मुख्यअधिकारी चंदन पाटील
बांधतलाव क्षेत्रातील सुर्याटोला रोड इथे ज्यांनी अतिक्रमण केले आहे. अश्या अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस नगर परिषदेकडून देण्यात आले आहे.

 

जिल्हा अधिका-यांनी केली पाहणी
बांधतलावाच्या ओव्हरफलो झालेल्या बांधतलावाच्या पाणी लोकांच्या घरात शिरल्याने जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी तत्काळ सुर्याटोला तसेच बांधतलाव येथे भेट दिली व बांधतलावावर असलेले अतिक्रमण व परीसराची पाहणी केली. हे प्रकरण गंभीर असल्यामूळे बांधतलावावर असलेले अतिक्रमण तत्काळ हटविण्याचे निर्देश तहसीलदार यांनी दिले आहेत. ५ महिन्या अगोदर आदेश दिले होते ,बांधतलाव चे ओव्हरफलो पाणि निघण्यासाठी कुडव्याकडे असलेल्या नाल्यावर अतिक्रमण करून बांधलेल्या भिंत तोडण्यासाठी गेल्या पाच महिन्यापुर्वीच तहसीलदारांना आदेश दिले होते. मात्र स्थिती गंभीर असल्याने दोन दिवसात हे अतिक्रमण हटविण्यात येईल.  व परीस्थितीवर नियंत्रण करण्यात येईल.
डॉ. विजय सुर्यवंशी
जिल्हा अधिकारी गोंदिया