शिष्यवृत्ती प्रलंबीत अर्ज १५ नोव्हेंबर पर्यंत सादर करावे

0
10

गोंदिया,दि.९ : शैक्षणिक सत्र सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २७६ महाविद्यालयातून ३५ हजार १८९ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. त्यापैकी २९ हजार ६७० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. २३६८ विद्यार्थी हे महाविद्यालयाच्या खऊ वर प्रलंबीत असून काही महाविद्यालयाने हार्ड कॉपी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय येथे सादर न केल्यामुळे २३६८ विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. तरी संबंधित महाविद्यालयांनी २३६८ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज १५ नोव्हेंबर पर्यंत सादर करावे.
शैक्षणिक सत्र २०११-१२ ते २०१५-१६ पर्यंतच्या महाविद्यालय स्तरावर प्रलंबीत अर्ज तपासणीकरीता १५ नोव्हेंबर पर्यंत सादर करावे. त्यानंतर २०१५-१६ पुर्वीचे अर्ज स्विकारले जाणार नाही. विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास याला संबंधित महाविद्यालय जबाबदार राहील. याची सर्व प्राचार्यांनी नोंद घ्यावी. शैक्षणिक सत्र २०१६-१७ पासून विद्यार्थ्यांना त्यांचे आधारकार्ड क्रमांक बँकेशी लिंक करुन बँकेचे लिंक प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लिंक प्रमाणपत्रानुसार आधारकार्ड लिंक झाले किंवा कसे याची पडताळणी प्राचार्य यांनी हींींीि://ीशीळवशर्पीं.ीळवरळ.पशीं.ळप या संकेतस्थळावर जावून तपासणी करणे आवश्यक आहे. याची तपासणी करुनच बँकेचे लिंक प्रमाणपत्र सादर करावे. शैक्षणिक सत्र २०१६-१७ मध्ये २७६ महाविद्यालयापैकी २५ महाविद्यालयाने फी मंजूरीच्या फाईल सादर केल्या आहे. तरी उर्वरित महाविद्यालयांनी १५ नोव्हेंबर पर्यंत फी मंजूरी व अर्ज तपासणीकरीता प्रस्ताव सादर करावे. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांनी केले आहे.