ओबीसी महामोर्च्यात सहभागी व्हा-इंजि.राजेंद्र पटले

0
16

तुमसर,दि.06 : येत्या ८ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे नागपुरातील विधानभवनावर राज्यघटनेने दिलेल्या सवैधानिक अधिकारासाठी काढण्यात येणार्या ओबीसी महामोर्चाला यशस्वी करण्यासोबतच या मोर्च्यात भंडारा जिल्ह्यातील सर्व ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन किसान गर्जनाचे संस्थापक अध्यक्ष व भंडारा जिल्हा शिवसेना प्रमुख इंजि.राजेंद्र पटले यांनी केले आहे.ओबीसी महामोर्च्यासंबधी तुमसर येथे पटले यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी हे आवाहन केले.यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय पक्ष समन्वयक माजी खासदार डाॅ.खुशालराव बोपचे,ओबीसी संघर्ष कृती समितीचे सयोंजक मार्गदर्शक खेमेंद्र कटरे,उपाध्य़क्ष कैलास भेलावे,प्रसिध्दी प्रमुख सावन डोये उपस्थित होते. ओबीसी संवैधानिक हक्कापासून वंचित आहे. ५२ टक्के ओबीसींना ५२ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे. आरक्षणासाठी ओबीसींचा वणवा आता पेटणारच, असा संकल्प इंजि.पटले यांनी व्यक्त केला.तुमसर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावागावातून ओबीसींना या मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन करीत शेतकरी शेतमजुराना वयाच्या 60 वर्षी पेंशन आणि त्यांच्या शेतमाला हमीभाव मिळण्यासोबतच ओबीसीच्या मंत्रालयाची मागणी रेटून धरण्यासाठी मतदारसंघातील जनतेने 7 डिसेंबरच्या रात्रीपासूनच रेल्वेसह जे साधन मिळेल त्याने नागपूरच्या दिशेने कुच करावे असेही म्हणाले.